लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील दलित वस्तीमधील समाज मंदिराचे उद्घाटन सरपंच मयूर जांभळे यांच्या हस्ते झाले. चौदावा वित्त आयोग, ग्रामपंचायत निधीतून अकरा लाख रुपये खर्चून हे समाज मंदिर बांधले आहे.
सरपंच मयूर जांभळे म्हणाले, बालिंगेच्या जनतेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिवाचे रान करणार आहे. गावाच्या विकासासाठी विविध विभागांतून निधी खेचून आणून आगामी काळात गावात विकासात्मक कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.
उपसरपंच पंकज कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, माजी सरपंच अनिल पोवार, भीमराव कांबळे, रघुनाथ कांबळे, सदस्य नंदकुमार जांभळे, अजित कांबळे, अजय भवड, प्रकाश जांभळे, पांडुरंग वाडकर, विजय जांभळे, कृष्णात माळी, धनंजय ढेंगे, आदी उपस्थित होते. ग्रामसेवक राजेंद्र भगत यांनी आभार मानले.
फोटो ओळी : बालिंगे (ता. करवीर) येथील दलित वस्तीमधील समाज मंदिराचे उद्घाटन सरपंच मयूर जांभळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मधुकर जांभळे, अनिल पोवार, पंकज कांबळे, आदी उपस्थित होते. (फोटो-१८०४२०२१-कोल-बालिंगे)