अर्जुनवाड : एकात्मिक बाल विकास प्रकल्प, शिरोळ १ अंतर्गत शिरटी (ता. शिरोळ) येथील अंगणवाडी क्रमांक ४७ ची स्मार्ट अंगणवाडी उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली आहे. या स्मार्ट अंगणवाडीचे उद्घाटन पंचायत समिती सभापती दीपाली परिट, उपसभापती राजगोंडा पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपक कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
स्मार्ट अंगणवाडीला मिळालेल्या साहित्यामध्ये सोलर लाईट सिस्टीम, एलईडी टी. व्ही., स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, बेबी किट यांचा समावेश आहे. अंगणवाडी सेविका शोभा भंडारे व मदतनीस सरिता बंडगर तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त अंगणवाडी सेविका यास्मिन मुल्लाणी व मदतनीस उज्ज्वला बंडगर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्वागत सेविका रूपाली भंडारे यांनी केले तर वनिता पाटील यांनी आभार मानले.
यावेळी सरपंच अनिता चौगुले, मल्लापा चौगुले, ग्रामसेवक मन्सूर मुजावर, पर्यवेक्षिका जयश्री माळी, अलका चौगुले, सोनाली हुवण्णावर, हसीना मुल्लाणी, भारती माळी, वैशाली ढेकळे यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
फोटो - ०८०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरटी (ता. शिरोळ) येथील अंगणवाडी सेविकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.