शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार; पंचगंगेची पाणी पातळी 34 फूटावर, 66 बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 11:51 AM

पंचगंगा नदीवरील 66 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून वरुण राजाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 34 फूट 4 इंच इतकी झाली आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील 66 बंधारेपाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूटावर असून धोका पातळी 43 फूटावर आहे.

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरु असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे. यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ शकते. तरी नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तर, गगनबावडा-कोल्हापूर रस्त्यावर मांडुकली येथे मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. करंजफेन व कांटे शिवजवळ वारंग मळी येथे पाणी आल्याने कोल्हापूर-राजापूर वाहतुक बंद झाली आहे. तसेच बर्की पुलावर पाणी आल्याने बर्की धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.राधानगरी धरण 85.95% भरले असून आज दिवसभरात धरण क्षेत्रात 150 मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी 333.58 फूट इतकी आहे. तर धरणामध्ये 7.19 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण 2563 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली असून खासगी बिओटी तत्त्वावर असलेल्या वीज निर्मिती केंद्रातून 1600 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. यामुळे भोगावती नदी पात्रात पाणी पातळी वाढ होत आहे. तर तुळशी धरणामध्ये 2.86 टीएमसी पाणीसाठा असून, तुळशी जलाशय 82. 39 टक्के भरले आहे.दुधगंगा धरणातून 1423 क्युसेक्सने विसर्गदूधगंगा धरणामध्ये सांडवा पातळीपर्यंत पाणीसाठा झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. आज दुपारी दोन वाजता दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे तसेच पाॅवर हाऊस मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 1423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात काल, दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 117.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, हातकणंगले- 34.2 मिमी, शिरोळ -18.1 मिमी, पन्हाळा- 71.1 मिमी, शाहूवाडी- 90 मिमी, राधानगरी- 65.5 मिमी, गगनबावडा- 117.3 मिमी, करवीर- 57.8 मिमी, कागल- 44.6 मिमी, गडहिंग्लज- 44.7 मिमी, भुदरगड- 84.4 मिमी, आजरा- 84.2 मिमी, चंदगड- 79.1 मिमी, असा एकूण 60 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.66 बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, निळपण, शेणगांव, म्हसवे, गारगोटी, कुरणी, बस्तवडे व चिखली, कुंभी नदीवरील- कळे, शेणवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड, भोगावती नदीवरील- हळदी व राशिवडे, वारणा नदीवरील- चिंचोली असे एकूण 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी