शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

खरीप हंगामातील भात पिकाचा पीकविमा योजनेत समावेश; किसान संघाच्या मागणीची दखल

By संदीप आडनाईक | Published: July 29, 2022 3:51 PM

खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही विमा योजना लागू नसल्यामुळे खासगी विमा कंपन्या या पिकांचा विमा उतरवत नव्हत्या.

संदीप आडनाईककोल्हापूर : आस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीकविम्याचे कवच देऊ केले असले तरी विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकरी याकडे पाठ फिरवतात. त्यातच खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही विमा योजना लागू नसल्यामुळे खासगी विमा कंपन्या या पिकांचा विमा उतरवत नव्हत्या. मात्र भारतीय किसान संघाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या कार्यालयाकडे या प्रश्नाचा पाठपुरावा केला आणि याची दखल घेऊन पीकविमा योजनेत भात पिकाचा समावेश केला आहे. बुधवारी (दि. २७) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत भात पिकाचा समावेश केला आहे.खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही योजना लागू करण्याकडे किसान संघाने शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. परंतु त्यांनी हतबलता दर्शविली. यामुळे किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांनी हा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या कार्यालयाकडे उपस्थित केला. यासंदर्भातील सविस्तर पत्र आणि पूर्वीचे सरकारी आदेश तसेच शेतकऱ्यांचे या विषयातले म्हणणे त्यांनी सविस्तर पत्राद्वारे पाठवले आणि टेलिफोनद्वारेही प्रत्यक्ष चर्चा केली. पावसाळ्याच्या आधीच यावर विचार करून निर्णय द्यावा, अशीही विनंती केली.

केंद्र सरकारने या पत्राची तातडीने दखल घेतली असून, शेतकऱ्यांच्या या मागणीची पूर्तता केली. बुधवारी (दि. २७) प्रसिद्ध झालेल्या केंद्राच्या पीकविमा योजनेबद्दलच्या जाहिरातीत खरीप हंगामाच्या भात पिकाचा समावेश केला आहे. खरिपाच्या पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याची मुदत आहे.

विमा योजनेच्या जुन्या शासन आदेशात भात पिकाचा समावेश नाही. म्हणूनच एचडीएफसी एर्गो आणि रिलायन्स या खासगी कंपन्या हा विमा उतरवण्यास नकार देत होते. आता नवीन जीआरमध्ये खरीप पीक म्हणून भात पीकाचा समावेश झालेला आहे, त्याचा लाभ घ्यावा.  -सिध्दार्थ शिंदे, उपाध्यक्ष, भारतीय किसान संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा