शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

निवडणूक काळात पैशाच्या व्यवहारांवर ‘आयकर’चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:47 IST

लोकसभा निवडणुुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. १० लाखांवरील व्यवहाराची संपूर्ण तपासणी होणार असून, संशयास्पद आढळल्यात तातडीने कारवाई होणार आहे.

ठळक मुद्दे१0 लाखांच्या वरील व्यवहारांची तपासणी होणारकोल्हापूरसह आठ मतदारसंघांत शीघ्र कृती दल स्थापन

कोल्हापूर : लोकसभा निवडणुुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. १० लाखांवरील व्यवहाराची संपूर्ण तपासणी होणार असून, संशयास्पद आढळल्यात तातडीने कारवाई होणार आहे.

कोल्हापूरसह हातकणंगले, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, माढा या मतदारसंघांसाठी शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या दलांतर्गत तयार करण्यात आलेली कंट्रोल रूम मतदान होईपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. हे सर्व काम अत्यंत गोपनीय पद्धतीने चालणार आहे, अशी माहिती आयकर विभाग (संशोधन)चे सहसंचालक पूर्णेश गुरुरानी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर होण्याच्या शक्यतेने आयकर विभाग सतर्क झाला आहे. कोल्हापूर विभागांतर्गत महाराष्ट्रातील लोकसभेचे आठ मतदार संघ येतात. या मतदार संघांमध्ये निवडणुकीच्या काळात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी आयकर विभागाने विशेष यंत्रणा कामाला लावली आहे.

या संदर्भात जनतेनेही सहभाग नोंदवावा, या हेतूने कंट्रोल रूमसह व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे पूर्णेश गुरुरानी यांनी सांगितले. १० लाखांच्या वर एकाच वेळी खात्यावर व्यवहार झाल्यास बँकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. के.वाय.सी.ची पूर्तता करून ती रक्कम दुसऱ्या बँकेत भरावयाची असल्यास रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनांवर वॉच ठेवला जाणार आहे.

यात बेहिशेबी रक्कम आढळल्यास ती जप्त करून १३२ कलमानुसार त्यावर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. सापडलेल्या रकमेचा अहवाल ४८ तासांच्या आत निवडणूक आयोगाकडे आयकर विभागाकडून पाठविला जाणार आहे, असेही गुरुरानी यांनी सांगितले. यावेळी ‘आयकर’चे उपसंचालक वैभव ढेरे, आयकर अधिकारी प्रकाश मोहिते उपस्थित होते.

विमानतळही ‘आयकर’च्या कक्षेतजिल्ह्यातील आठ मतदारसंघांसह विमानतळावरही एक दल कार्यरत राहणार आहे. तेथे येणारी विमाने व हेलिकॉप्टरची तपासणी होणार आहेत. आठ मतदारसंघांत सात अधिकारी, दोन आयटी विस्तार अधिकारी, तीन आयकर अधिकारी या दलामध्ये कार्यरत राहणार आहेत.

व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार करता येणारप्रचारकाळात पैसे वाटप होत असतील तर फोटो व व्हिडीओ आयकर विभागाच्या ७४९८९७७८९८ या क्रमांकावर पाठविता येणार आहेत. यावर आलेल्या तक्रारीस अनुसरून कारवाई सुरू होणार आहे. तसेच कंट्रोल रूममध्ये १८००२३३०७०० व १८००२३३०७०१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. येथे मतदार निवडणुकीच्या संदर्भातील तक्रारी करू शकणार आहेत.

बँका, हॉटेलवर करडी नजरबँकांमधून रोकड नेली जाणार असल्याने तेथे आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बैठका होतील, अशा हॉटेलवर या शीघ्र कृती दलाची करडी नजर असणार आहे. अशा हॉटेलची यादी तयार करण्यात आली असून, तेथे कायमस्वरूपी पहारा राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जी ठिकाणे संवेदनशील वाटत आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून ठेवण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयkolhapurकोल्हापूर