उत्तूर :
गेली ३० वर्षे अखंडपणे सेवा देणाऱ्या गडहिंग्लज आगाराच्या महागोंड चिमणे-मार्गावर धावणाऱ्या बससेवा बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधित बससेवा सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गडहिंग्लज आगाराने कापशी (ता. कागल) मुक्काम असणारी फेरी लॉकडाऊनच्या काळात बंद केली. ती अद्याप सुरू केलेली नाही.
कापशी-गडहिंग्लज-अरळगुंडी, त्यानंतर अरळगुंडी-उत्तूर-वझरे अशी बस धावते. सकाळच्या सत्रात या मार्गावर बस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ही बस पूर्ववत सुरू करावी, अन्यथा आंदोलन करू,असा इशारा दिला आहे.
---------------------------
कोट...
कमी उत्पन्नामुळे बंद
वझरे, अरळगुंडी या मार्गावर बसला मिळणारे कमी उत्पन्न व वडापला मिळणारा प्रतिसाद यामुळे संबंधित मार्गावरील फेरी बंद केली. तशा सूचना संबंधित ग्रामस्थांना दिल्या होत्या. मात्र, बसचे उत्पन्न वाढू शकले नाही.
- संजय चव्हाण, आगारप्रमुख गडहिंग्लज.