शिरोळ : शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेत बनावट क्रेडिट मेमो, कीर्द पावत्या करून अपहार व फसवणूक केल्याप्रकरणातील संशयित आरोपी अमर गुरव (वय ५५, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अपहारप्रकरणी गुरव याच्यासह प्रकाश आप्पा काळे (रा. पाचगांव), शहाजी रघुनाथ जाधव (रा. आसुर्ले) व नीलेश प्रकाश निर्मळ (रा. इचलकरंजी) अशा चौघांवर यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुरव याला शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. एकूण ३६ लाख ७२ हजार रुपयांचा हा अपहार असून अपहाराच्या रकमेचे काय केले, या गुन्ह्यामागे आणखीन कोण राजकीय लोक आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. मंगळवारी न्यायालयात सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद करुन पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केल्यानंतर न्यायालयाने संशयित गुरव याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.