कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबासह समितीच्या अखत्यारीतील मंदिरांची दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.देवस्थान समितीची बैठक मुख्य कार्यालयात पार पडली. यावेळी श्री अंबाबाई, जोतिबा, दत्त भीक्षालिंग, ओढ्यावरील सिध्दिविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरांतील दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समितीच्या अधिपत्याखालील अन्य मंदिरांच्या वेळेसंदर्भात स्थानिक उपसमितीच्यावतीने निर्णय घेतला जाईल.विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंदिरातील विकास कामांची माहिती दिली. समितीच्यावतीने जाधव यांनी देवीची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. यावेळी समिती सदस्य राजेंद्र जाधव, अशोक देसाई, तुषार देसाई व पदाधिकारी उपस्थित होते.
अंबाबाई-जोतिबा मंदिरातील दर्शन वेळेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 8:08 PM
Mahalaxmi Temple Kolhapur- अंबाबाई, जोतिबासह समितीच्या अखत्यारीतील मंदिरांची दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअंबाबाई-जोतिबा मंदिरातील दर्शन वेळेत वाढदेवीचे दर्शन आता सकाळी सात ते रात्री आठ