अमर मगदूम - राशिवडे -हुंड्यासाठी त्रास, मूल होत नाही, अशा अनेक कारणांमुळे अनेक कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडून संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, बदलत्या जीवनशैलीत कौटुंबिक समस्येने अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत. कौटुंबिक समस्येत मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक वागणूक, छेडछाड ही किरकोळ कारणे गंभीर स्वरूप घेत आहेत. राज्य महिला आयोग व जिल्हा समन्वय संस्थेच्या वार्षिक अहवालात कौटुंबिक समस्येपेक्षा इतर कारणांमध्ये कमालीची घट नोंदविली आहे.हुंडा, मूल होत नाही, सासू-सुनेचे पटत नाही, दारू पिऊन मारहाण, चारित्र्यावर संशय, अशिक्षित या व अशा अनेक कारणांमुळे अनेक कुटुंबांत वाद होऊन अनेकांनी पोलीस ठाण्याच्या चकरा मारण्यातच संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. अशा घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने राज्य महिला आयोगाची स्थापना करून तालुकानिहाय महिला समुपदेशन केंद्राची निर्मिती केली आहे. या समुपदेशन केंद्रात येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप पाहता कौटुंबिक समस्येचे प्रमाण अधिक आहे.सोशल मीडिया, मोबाईल, टी.व्ही.च्या युगात कौटुंबिक समस्यांही बदलताना दिसत आहेत. सासू, सून, पती, भावजय, दीर, सासरे, अशा नात्यांमध्ये अविश्वासाने वाद निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातून वैवाहिक जीवन संपुष्टात येणे, आत्महत्या, नैराश्य अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना घटनेने दिलेले अधिकार व मानवाधिकार यांची माहिती व्हावी, यासाठी मासूम, सदाफुली, साथी यासारखी गावपातळीवरील केंद्रे कार्यरत आहेत. स्त्रियांवरील हिंसा हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे, ही जाणीव निर्माण केल्यास त्याविरोधात एकत्रित प्रयत्न करता येतील. - सुशीलाबेन शहा, अध्यक्षा, राज्य महिला आयोगनात्यांमध्ये किरकोळ कारणाने व अविश्वासामुळे वाद निर्माण होतात. त्याचे स्वरूप किरकोळ असते, तर कधी गंभीर असते. अशावेळी समुपदेशनाची गरज असते. या प्रक्रियेत न्याय तर मिळणारच; पण अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाते. तालुकावार अशा समुपदेश केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, महिलांनी आपल्यावर होणारे अत्याचार सहन न करता केंद्रात जाऊन तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव, पत्ता गोपनीय ठेवला जातो. - आनंदा शिंदे-राशिवडेकर, जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोगमारहाण हे स्त्रियांवरील हिंसेचे उघड स्वरूप आहे. मानसिक जाच, शिवीगाळ, हीन वागणूक, लैंगिक छळ, छेडछाड त्याबरोबर सतत नियंत्रण ठेवणे, निर्णय घेऊ न देणे, स्वातंत्र्य नाकारणे ही महिलांवरील हिंसाच आहे. या हिंसेचा परिणाम स्त्रियांच्या मनावर, शरीरावर आणि संपूर्ण आयुष्यावर होत असतो. पीडित महिलांनी आयुष्यभर त्रास सहन करीत बसण्यापेक्षा महिला समुपदेशन केंद्रात आपली तक्रार नोंदविली पाहिजे. अशा पीडितांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, समुपदेशक यांनी मार्गदर्शन करावे. - चित्रा वाघ, सदस्या, राज्य महिला आयोगतालुका / हुंड्यासाठीदारू पिऊन मूल चारित्र्याचामुलगाअशिक्षितपतीचे सासू-सुनेचेकौटुंबिक जिल्हात्रासमारहाणहोत नाहीसंशयहोत नाहीअनैतिक संबंधवादसमस्याकागल१२७११८२०३४२९३९कोल्हापूर०३१००१०३१राधानगरी१२२२६१०१३४४२०२३भुदरगड५१२३१५४-११२३१२हातकणंगले८१३५१२५-१५१७२३पन्हाळा३४६५७४३५३४गडहिंग्लज१२७४१५५-८१५१४
कौटुंबिक समस्यांमध्ये होतेय वाढ!
By admin | Published: March 18, 2015 11:03 PM