शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Fuel price hike : पेट्रोल पंपाची मदार आता फक्त दुचाकींवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 4:50 PM

इंधनाचे भाव वाढल्याने वाहनधारक चारचाकीचा जास्त वापर करत नसल्याने दुचाकीचा वापर वाढला आहे.

सचिन भोसलेकोल्हापूर : इंधनाचे भाव वाढल्याने वाहनधारक चारचाकीचा जास्त वापर करत नसल्याने दुचाकीचा वापर वाढला आहे. या वापरामुळे पेट्रोल पंपांवर केवळ दुचाकीच्याच वाहनांच्या रांगा अधिक दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह शहरातील पेट्रोल पंपांची मदार केवळ दुचाकीवरच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ३४३ पंप कार्यान्वित आहेत.पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांनी पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बाइकचा आधार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या महिन्याच्या इंधन खर्चात बचत होत आहे. प्रति कि.मी. ४० ते ६० पैसे इतकाच खर्च येत असल्याने अनेकांचा ओढा इलेक्ट्रीक बाइककडे वाढला आहे. त्यामुळे १६४० ई-बाइक आता जिल्ह्यातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. हा आकडा रोज वाढतच आहे.रिक्षांमध्ये एलपीजी, कारमध्ये सीएनजीपेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजी प्रति किलोचे दर ७६.५० पैसे इतके कमी व मायलेजही चांगले देत असल्याने अनेक कारचालकांनी पेट्रोल चारचाकीला सीएनजी किट बसवून घेतले आहे. अनेकांनी सीएनजी कारच खरेदी केल्या आहेत. त्यामुळे सीएनजीचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. तर रिक्षांमध्येही सीएनजीचा वापर वाढला आहे. तर काही रिक्षाचालक एलपीजीही वापर करीत आहेत.डिझेल, पेट्रोल विक्रीवर परिणामपेट्रोल, डिझेलच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी सीएनजीचा पर्याय निवडला आहे. याशिवाय जिल्ह्याला कर्नाटकची सीमा लागून आहे. तेथे पेट्रोल, डिझेलमध्ये किमान सात ते आठ रुपये स्वस्त असल्याने तेथे जाऊन पेट्रोल, डिझेल भरून येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर झाला आहे. विशेषत: इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, एमआयडीसी, जयसिंगपूर, आदी ठिकाणच्या पंपांवर परिणाम झाला आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली.

जिल्ह्यात पंप असे,पेट्रोल पंप - ३४३सीएनजी - ७एलपीजी -५

इंधनाच्या किमतीइंधन                            भाव                रोजची विक्री

पेट्रोल (प्रतिलिटर)           ११०.०७           ५, ४०,००० लिटरडिझेल (प्रतिलिटर)          ९२.६४             ६, २०,००० लिटर

सी.एन.जी. (प्रति किलो)    ७६.५०             १०,५०० किलो

शहरातील वाहनेदुचाकी - १०, ३१, ३०१तीनचाकी -१५,०००व्यावसायिक वाहने - ५७, ६६०ई- बाइक - १६८०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPetrolपेट्रोलFuel Hikeइंधन दरवाढtwo wheelerटू व्हीलर