कोल्हापूर : साखर उद्योगाच्या हिताच्यादृष्टीने उसाच्या एफआरपीच्या तुलनेत साखरेची किमान आधारभूत किंमत वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे साखरेच्या आधारभूत दरात वाढ करा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. कागल - बेळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागून नवीन रेल्वे ट्रॅक निर्माण व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये २८५ रुपये प्रतिक्विंटल वाढ केली. २०१८ मध्ये साखरेची किमान आधारभूत किंमत २९ रुपये प्रतिकिलो होती. पुढीलवर्षी त्यात दोन रुपयांची वाढ झाली. त्यानंतर वाढीची शिफारस झाली, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे साखर कारखान्यांना फटका बसत असल्याचे घाटगे यांनी निदर्शनास आणून दिले.जर मिरज-कोल्हापूर या रेल्वे ट्रॅकला जोडणारा कोल्हापूर-कागल-बेळगाव असा नवीन रेल्वे ट्रॅक तयार केला, तर त्यामुळे कोल्हापूर, कोकण आणि कर्नाटक व्यापार-उद्योग क्षेत्रास चालना मिळेल. शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही गती निर्माण होईल. त्यामुळे कोल्हापूर-कागल-बेळगाव या ट्रॅकची निर्मिती व्हावी, अशी विनंतीही यावेळी त्यांना निवेदनाद्वारे केली.
साखरेच्या किमान आधारभूत दरात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 8:08 PM
Suger Samarjit Singh Ghatge piyush goyal -साखर उद्योगाच्या हिताच्यादृष्टीने उसाच्या एफआरपीच्या तुलनेत साखरेची किमान आधारभूत किंमत वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे साखरेच्या आधारभूत दरात वाढ करा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. कागल - बेळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागून नवीन रेल्वे ट्रॅक निर्माण व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ठळक मुद्देसाखरेच्या किमान आधारभूत दरात वाढ करा समरजित घाटगे यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी