ग्रामीण भागातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा : संजयसिंह चव्हाण
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुगणसंख्येत प्रचंड वाढ होत आहे, ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत,या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी करंजफेण (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोना चाचण्या व लसीकरणाचा आढावा घेतला.
कासारी खोऱ्यातील करंजफेण बाजारपेठत लोकांची नेहमीच गर्दी असते, तसेच या भागात मुंबई, पुणे येथून येणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. त्यामुळे करंजफेण, कांटे, मोसम या परिसरात रुग्ण सापडले आहेत. तरीसुद्धा लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी करंजफेण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन या परिसरातील बरेच दिवस ताप, सर्दी, खोकला, आदी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या लोकांना कोरोना चाचण्या करून, लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना आरोग्य प्रशासनाला दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, शाहूवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकासाधिकारी अनिल वाघमारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ सातपुते, सुनील जाधव, एस. एल. साठे, प्राथमिक शिक्षक अनिल कांबळे, दशरथ आयरे उपस्थित होते.