शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

‘एफआरपी’मध्ये टनास १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:05 PM

विश्वास पाटील। कोल्हापूर : आगामी हंगामात उसाच्या वाजवी व किफायतशीर किमतीत (एफआरपी) टनास बेसिक १० उताऱ्यास १०० रुपयांची वाढ ...

ठळक मुद्देकृषिमूल्य आयोग : आंदोलनाशिवाय टनास तीन हजार पक्के

विश्वास पाटील।कोल्हापूर : आगामी हंगामात उसाच्या वाजवी व किफायतशीर किमतीत (एफआरपी) टनास बेसिक १० उताऱ्यास १०० रुपयांची वाढ करण्याची शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केली आहे. त्यामुळे साडेबारा उताºयास टनास तोडणी-ओढणी वजा करून शेतकऱ्यांस न आंदोलन करताच तीन हजार रुपये कायद्यानेच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.केंद्र शासनाने सोमवारीच (दि. १) चौदा खरीप पिकांच्या हमीभावात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमूल्य आयोगाची ही शिफारस केंद्र सरकारकडून स्वीकारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० उताºयास किमान २८५० रुपये (तोडणी-ओढणी खर्चासह) मिळू शकतात. ‘एफआरपी’मध्ये वाढ केली तर केंद्राने साखरेचा खरेदी दरही किमान क्विंंटलला ३५०० रुपये करण्याची गरज आहे अन्यथा कारखानदारीच्या अडचणी वाढतील.

मागच्या हंगामातील एफआरपी दहा उताºयास २७५० रुपये होती. ती १०० रुपये वाढल्याने २८५० रुपये होईल. त्याशिवाय त्यावरील उताºयास गतवर्षी २७५ रुपये दिले जात होते. आता २८५ दिले जाऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी उतारा १२.५० पर्यंत असतो. त्यामुळे त्याचा हिशेब केल्यास टनास ३५६३ रुपये एफआरपी मिळू शकते. त्यातून तोडणी-ओढणी खर्चाचे ६०० रुपये वजा केल्यास शेतकºयाला एफआरपीच २९६३ रुपये मिळू शकते. साखरेचा खरेदीदर ३१०० रुपये विचारात घेतल्यास कारखान्याला एका टनापासून एकत्रित उत्पन्न म्हणून ४३०० रुपये मिळतात. त्यातून एफआरपीचे ३५६३ रुपये वजा केल्यास ७३७ रुपयेच शिल्लक राहतात. साखरेचा किमान उत्पादन खर्च किमान १२५० रुपये आहे. त्यामुळे नुसती एफआरपी वाढवली व साखर खरेदीचा दर वाढवला नाही तर मात्र कारखान्यांसमोरील अडचणी वाढतील, अशी भीती उद्योगातून व्यक्त होत आहे व त्यात नक्कीच तथ्य आहे.

एफआरपीचा आधार काय...साखर उत्पादनाचा प्रत्यक्ष खर्चसाखरेची मागणी व पुरवठा यांतील मेळदेशांतर्गत व देशाबाहेरील साखरेचे दरआंतरपिकांपासून मिळणारे उत्पन्नसाखरेच्या उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्नउसाचा उत्पादन खर्चऊस उत्पादकास वाजवी परतावा

 

केंद्र शासन एका बाजूने प्रत्येक वर्षी एफआरपीची किंमत वाढवत आहे. शेतकरी हिताचा विचार करता हे चांगलेच आहे; परंतु कारखानदारी टिकायची असेल तर केंद्राने साखरेचा किमान खरेदी दरही क्विंटलला ३१०० ऐवजी ३५०० रुपये करण्याची गरज आहे, अन्यथा कारखानदारीची दुखणी वाढतील.- विजय औताडे, साखर उद्योग तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा