कोल्हापूर : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात नवे १९४७ रुग्ण नोंदवण्यात आले असून ४६ जणांचा मृत्यू झाला. १६२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रोज वाढलेली रुग्णसंख्या पाहून लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठत आहे परंतु संसर्ग टाळण्यासाठी जे करायला हवे, ते मात्र तो करायला तयार नाही.
कोल्हापूर शहरामध्ये ६४२ नवे रुग्ण आढळले असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात ३२४, तर हातकणंगले तालुक्यात २५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. आठ ते नऊ हजार चाचण्या रोज केल्या जात असल्यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात आले.
मृतांमध्ये हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक मृत्यू असून त्याखालोखाल करवीर तालुक्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. इचलकरंजी येथील मृतांचा आकडा कमी येत असला तरी, हातकणंगले तालुक्यातील आकडा कमी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
चौकट
सर्वाधिक मृत्यू हातकणंगले तालुक्यातील
हातकणंगले १०
मिणचे, जुने पारगाव, नवे पारगाव, पट्टणकोडोली २, कबनूर, तारदाळ, नेज, आळते, हुपरी
करवीर ०८
गोकुळ शिरगाव २, खुपिरे, कणेरी, पाचगाव २, उजळाईवाडी, उचगाव
कोल्हापूर ०६
साने गुरुजी वसाहत, राजारामपुरी, आर. के. नगर, रामानंदनगर, कसबा बावडा, रेल्वे स्टेशन
पन्हाळा ०४
कोडोली, सातवे, जाखले, आरळे
इचलकरंजी ०३
भारतमाता हौसिंग सोसायटी, केटकाळे गल्ली, शांतिनगर
शिरोळ ०२
हेरवाड, यड्राव
आजरा ०२
किणे, जाधेवाडी
चंदगड ०२
लाकूडवाडी, अडकूर
गडहिंग्लज ०२
भडगाव, हलकर्णी
शाहूवाडी ०१
सरूड
कागल ०१
कागल
भुदरगड ०१
कलनाकवाडी
इतर ०४
माणकापूर, नेवरे, तळेरे, खेडबीरे