जून महिन्यात पावसाने जोर धरला होता. समाधानकारक पावसामुळे शेतकरी राजा सुखावल्याने पेरणीच्या कामाला सुरुवात झाली होती. पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने शेतीच्या कामास गती येत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फूट व धोका पातळी ७१ फूट आहे. इचलकरंजी शहरात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असला तरी पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.
चौकट
गळती काढण्याचे काम थांबविले
कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शिरढोण (ता.शिरोळ) नजीक नदीपात्रातच गळती लागली होती. जलवाहिनीवर केंदाळ साचल्याने ते काढण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते; मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पाणीपातळीत वाढ झाली असून, जलवाहिनी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे गळती काढण्याचे काम थांबविण्यात आले आहे.
फोटो ओळी
१३०७२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
छाया-उत्तम पाटील