शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वाढत्या उन्हाने खरीप पिकांनी माना टाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:44 AM

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता पावसाने ओढ धरल्याने जमीन तडकू लागली आहे.खरीप पेरणीला पोषक असाच पाऊस राहिल्याने कोल्हापूर विभागातील पेरण्यांना गती आली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत खरिपात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, बाजरी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. वेळेत झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण जोमात झाली; पण आॅगस्टअखेर तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; पण पावसाने एकदमच दडी मारली. गेले दहा-बारा दिवस एक थेंबही पडलेला नाही. त्यात कडक ऊन्हाने कोल्हापूर विभागातील अकरा लाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसावर अवलंबून असणाºया डोंगरमाथा, माळरानावरील पिके अडचणीत आली आहेत.दुष्काळ ओला म्हणायची की सुका?तीन महिने झालेल्या पावसाने पिके गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली. आता उरलीसुरली पिके हातातोंडाला आली असताना पावसाने दडी मारल्याने ‘सुका’ दुष्काळ जाहीर करा, असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.सहा तालुक्यांत५० टक्क्यांपेक्षा पाऊस कमीकोल्हापूर विभागातील माण, फलटण, जत, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षापाऊस कमी झाला आहे.सर्वांत कमी पाऊस माण तालुक्यात साडेतीन महिन्यात केवळ १५५ मिलिमीटर (४१ टक्के) पाऊस झाला आहे; तर सर्वाधिक पाऊस शाहूवाडी व कागल तालुक्यांत (१५७ टक्के) झाला आहे.जिल्हानिहाय पेरणी हेक्टरमध्ये व पाऊस असाजिल्हा पेरणी गाळपासाठी पाऊसउपलब्ध उसाचे क्षेत्र मिलिमीटरसातारा ४.०८ लाख ८२ हजार ४८४ ११५८०सांगली ३.३७ लाख ८९ हजार ९१८ ३२२७कोल्हापूर ३.९० लाख १ लाख ४९ हजार २८० १८१७८