कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.गेल्या आठवड्यात डॉ. मोरे यांची या पदावर बदली करण्यात आली होती; तर डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची बारामतीला बदली करण्यात आली आहे. डॉ. मोरे यांनी दुपारी कार्यभार स्वीकारून सर्व विभागप्रमुखांशी चर्चा करून प्राथमिक आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची स्थितीही त्यांनी जाणून घेतली.बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे बारावीपर्यंत शिकलेल्या डॉ. मोरे यांचे वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे. आंबेजोगाई, औरंगाबाद, धुळे, यवतमाळ या ठिकाणी त्यांनी अधिव्याख्याता म्हणून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम पाहिले. चंद्रपूर येथे पाच वर्षे अधिष्ठाता म्हणून ते कार्यरत होते.
अधिष्ठाता एस. एस. मोरे यांनी स्वीकारला कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:33 AM
cprhospital, kolhapurnews राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
ठळक मुद्देअधिष्ठाता एस. एस. मोरे यांनी स्वीकारला कार्यभारगेल्या आठवड्यात डॉ. मोरे यांची पदावर बदली