कोल्हापूर : कोल्हापूर चर्च कौन्सिलच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्था सचिव रेव्ह. आर. आर. मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी एस्तेर पॅटन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व्ही. यू. विजापूरकर, विजय खाबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नेहरू हायस्कूल
कोल्हापूर : नेहरू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोहामेडन एज्युकेशन सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासक कादर हमजा मलबारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी संस्था चेअरमन गणी आजरेकर, शाळा समिती चेअरमन रफीक मुल्ला, उपाध्यक्ष आदिल फरास, लियाकत मुजावर, फारुक पटवेगार, अल्ताफ झांजी, जहाँगीर अत्तार, मलिक बागवान, पापाभाई बागवान, इम्तिहाज पन्हाळकर, नासीर धारवाडकर, यासीन उस्ताद, फिरोज मुजावर, शकील मोमीन, मोहिद्दीन सय्यद, दिलावर पठाण, मुख्याध्यापक एस. एस. काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
राजर्षी शाहू तरुण मंडळ
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त मिरजकर तिकटी येथे नंदकुमार आहीर यांच्या हस्ते व नंदू भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले. यावेळी बाबूराव चव्हाण, सुनील मोहिते, स. ना. जोशी, सुभाष पोवार, अब्दुल मुल्ला, गजानन चव्हाण, अशोक पोवार, प्रदीप काटकर, अशोक पोवार आदी उपस्थित होते.
कोल्हापूर परीट समाज
कोल्हापूर : येथील परीट समाजाच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ संचालक दशरथ लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सचिव उदय भालकर, माजी अध्यक्ष व संचालक वसंतराव वठारकर, दीपक लिंगम, तात्यासाहेब भालकर, समाज अध्यक्ष प्रकाशराव भालकर, उमेश बुधले, रामचंद्र परीट आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रबुद्ध भारत हायस्कूल
कोल्हापूर : लक्षतीर्थ येथील प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये स्वांतत्र्यदिनानिमित्त संस्था सचिव शन्मुखा अर्दाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी रोटरॅक्टचे अखिलेश जाधव, करण कांबळे, अमित यादव, स्फूर्ती जाधव, आदित्य पाटील, मुख्याध्यापक पांडुरंग रामाणे, संजय अर्दाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तराजू हाैसिंग सोसायटी
कोल्हापूर : महावीर नगरातील तराजू हौसिंग सोसायटीच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ सभासद दिलीप पेटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष उल्हास दोशी, राजमल परमार, हेमंत गांधी, अशोक जामसांडेकर, प्रकाश चव्हाण, लक्ष्मीचंद गांधी, प्रा. रुपा शहा, डाॅ. शक्ती पातकर, उज्ज्वला शहा, हेमंत दुधाणे, सुभाष ओसवाल, तेजमल ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
म. दु. श्रेष्ठी समता हायस्कूल
कोल्हापूर : भोसलेवाडीतील म. दु. श्रेष्ठी समता हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी माजी महापौर भीमराव पवार होते. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, खादी संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, मिरासो मगदूम, भरत लाटकर, हसन देसाई, सविता देसाई, प्रा. रवी दामुगडे, मुख्याध्यापक शशिकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
विकास विद्यामंदिर
कोल्हापूर : येथील विकास विद्यामंदिरमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटचे नायब सुभेदार विनोद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी आर. वाय. पाटील होते. यावेळी राजेंद्र जाधव, मुख्याध्यापिका कुसुम भोसले, अस्लम शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते.
वायल्डर मेमोरियल चर्च
कोल्हापूर : न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त धर्मगुरु रेव्ह. डी. बी. समुद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी रेव्ह. पी. जे. साळवे, चर्च ट्रस्टचे अध्यक्ष आनंद म्हाळुंगेकर, अनिल जाधव, शांतराज समुद्रे, उदय बिजापूरकर, सिनाय काळे, संदीप थोरात, अतुल रुकडीकर, ॲड. डॅनियल धनवडे, रुथ जाधव, मेरियम चोपडे, प्रफुल्ल धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.