कोल्हापूर : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांत ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना दिले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात येणार आहे.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांना सर्तक राहून नाकाबंदीसह गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार नांगरे-पाटील यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथील पोलीस अधीक्षकांना सर्तक राहण्याच्या सूचना देत कठोर कारवाईचे निर्देश दिले. गुन्हेगारी वास्तव असलेल्या झोपडपट्ट्यांसह संवेदनशील ठिकाणी झाडाझडती घ्यावी.
दंगल काबू पथकाद्वारे संचलन करावे, सीमारेषेसह प्रत्येक नाक्यांवर व चौकांत पोलिसांची फौज तैनात करावी. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करावी, आदी सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या आहेत.