शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

इचलकरंजीत राष्ट्रवादी नेत्यांच्या स्वतंत्र बैठका

By admin | Published: December 14, 2015 1:05 AM

‘शविआ’त मतभेद उघड : धनंजय महाडिक यांचे आप्पांसाठी ‘शविआ’ला साकडे; तर सतेज पाटील यांच्यासाठी मुश्रीफांंची बैठक

इचलकरंजी : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीचे दौरे करीत नगरसेवकांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. खासदार महाडिक यांनी आमदार महादेवराव महाडिक यांना मतदान करण्याचे, तर आमदार मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या दोघांच्या भेटीवेळी शहर विकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे निदर्शनास आल्याची येथील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.खासदार महाडिक व आमदार सुरेश हाळवणकर यांनी आमराईमधील राजू आलासे यांच्या यंत्रमाग कारखान्याच्या कार्यालयात शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीमध्ये ‘शविआ’च्या सर्व १८ नगरसेवकांना महादेवराव महाडिक यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी पक्षप्रतोद अजित जाधव, निमंत्रक तानाजी पोवार, गटनेते महादेव गौड, कार्याध्यक्ष जयवंत लायकर, आदी उपस्थित होते.आमदार मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या निवासस्थानी जांभळे गटाच्या नगरसेवकांची भेट घेतली. त्यावेळी पक्षप्रतोद रवींद्र माने यांच्यासह सहा नगरसेवक उपस्थित होते. मुश्रीफ यांनी कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे यांच्या निवासस्थानी कारंडे गटाच्या नगरसेवकांची भेट घेऊन पाटील यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह चार नगरसेवक उपस्थित होते. यावेळी ‘शविआ’चे बादशहा बागवान व सागर चाळके उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुश्रीफ यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांची भेट घेतली.खासदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांनी नगरसेवकांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. त्यामध्ये मुश्रीफ यांच्या कारंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला चाळके व बागवान यांनी उपस्थिती दाखविल्याने शहर विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे निष्पन्न झाले असल्याची चर्चा होती.आॅफरचा धमाका : दोन्ही गटांकडील सावधगिरी आणि मॅजिक फिगरविाानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील व आमदार महाडिक हे दोघेच उमेदवार उभे असून, इचलकरंजीतील नगरसेवकांचे मतदान निर्णायक ठरेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून इचलकरंजीतील नगरसेवकांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. येथे होणाऱ्या वाटाघाटीमध्ये जिल्ह्यात सर्वांत जास्त ‘मॅजिक फिगर’ निघणार आहे. या ‘मॅजिक फिगर’चा आकडा बाहेर फुटल्यास त्याचे जिल्हाभर पेव फुटेल. म्हणून दोन्ही बाजूंकडून सावधगिरी बाळगली जात आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक दुसऱ्यापेक्षा ५० हजारांनी झुकते माप दिले जाईल, असे सांगून सहलीवर चला, अशी ‘आॅफर’ देत आहेत. मात्र, इचलकरंजीतील मतदारांकडून त्याला सध्यातरी दाद दिली जात नाही. परिणामी, दोन्ही बाजूंकडे अस्वस्थता वाढू लागली आहे.