संदीप आडनाईक ।कोल्हापूर : नेहमी श्रोत्यांच्याच भूमिकेत असणारे ‘दृष्टी दिव्यांग मित्र’ आता स्वत:च्या मालकीच्या इंटरनेट रेडिओचे संचालन करू लागले आहेत. ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरच्या सहकार्याने ‘ब्रेलवाणी’ नावाने हे इंटरनेट रेडिओचे प्रक्षेपण हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त सुरू झाले आहे.
पुणेस्थित ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड’ या दृष्टिदिव्यांग मित्रांच्या संस्थेचे संस्थापक सचिव कोल्हापुरातील सतीश नवले या दृष्टिदिव्यांग मित्राचे हे स्वप्न आज सत्यात उतरले.पंजाब येथील ‘प्राईम टेलिकास्ट’ या कंपनीच्या सहकार्याने डॉ. हेलन केलर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दि. २२ जून रोजी ‘ब्रेलवाणी’चे पहिले प्रक्षेपण झाले. यापूर्वी सन २०१५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘ब्रेलवाणी’चे प्रक्षेपण झाले होते; परंतु आर्थिक अडचणींमुळे ते वर्षभरच चालले. आता कºहाड आणि कोल्हापूर येथून या ‘ब्रेलवाणी’चे कामकाज सुरू झाले आहे. इंटरनेटवरील ही वाहिनी या लिंकवर http://www.ostv.in:8000/pafb.mp3 ऐकता येईल.
या ‘ब्रेलवाणी’च्या पहिल्या प्रक्षेपणात सचिन तेंडुलकर यांच्या ‘ध्रुवतारा’ या आॅडिओ बुकचे वाचन करण्यात आले, तर दृष्टिदिव्यांगांसह इतरांनी गायिलेली काही गाणीही प्रक्षेपित करण्यात आली. नजीकच्या काळात काही मुलाखती या वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या वाहिनीचा उपयोग दृष्टिदिव्यांगांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी करण्यात येणार आहे.कऱ्हाड नगरपालिकेने दिली मोफत जागाया ‘ब्रेलवाणी’चा सेटअप प्राईम टेलिकास्टने यापूर्वीच केला आहे. कऱ्हाड नगरपालिकेने यासाठी मोफत जागा दिली असून, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथून या रेडिओचे संचालन होत आहे.यासाठी हर्षद जाधव, हणमंत जोशी, जगदीप कव्हाळ, सविता गायकवाड यांच्यासह १५ जणांची टीम सज्ज आहे. या वाहिनीद्वारे ई-लर्निंगचे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती सतीश नवले यांनी दिली.ब्रेलवाणी’साठी अर्थसाह्यसचिन तेंडुलकरच्या प्रोत्साहनामुळे त्यांचे चाहते पुनित बालन यांनी ‘ब्रेलवाणी’साठी ८ लाख १० हजार रुपयांचा धनादेशाचा पहिला हप्ता संस्थेकडे सुपूर्द केला आहे.क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्यामुळे सचिन या संस्थेसोबत जोडला गेला आहे.२४ एप्रिलला सचिनने जन्मदिवसाच्या व्यस्त वेळेतूनही ३.३० ते ३.४५ असे १५ मिनिटे संस्थेच्या सदस्यांशी ‘स्काईप’च्या माध्यमातून संवाद साधत ‘ब्रेलवाणी’च्या कामासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.