इचलकरंजी : मराठा आरक्षण मेळाव्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी संभाजीराव भिडे यांच्यावर टीका केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सावंत यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली, तर एका कार्यकर्त्याने व्यासपीठाच्या दिशेने फेकलेला फरशीचा तुकडा खुर्चीवर आपटला. त्यामुळे मेळाव्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मेळाव्यातून बाहेर पडताना सावंत यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. तसेच नाट्यगृहाच्या आवारातून बाहेर पडताना आमदार नीतेश राणे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाजूला करून गाडीचा मार्ग मोकळा करून दिला. या घटनांमुळे नाट्यगृह परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली असून, गस्तही ठेवली आहे.इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात युवा मराठा आरक्षण कृती समितीच्यावतीने मंगळवारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी आमदार नीतेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यामधील आपल्या भाषणामध्ये इंद्रजित सावंत यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृतपणे मांडला जात असल्याचा आरोप केला. मात्र, मेळाव्याच्या आयोजकांपैकी शिवप्रतिष्ठानच्या सुमारे पन्नासभर कार्यकर्त्यांनी उठून त्याला विरोध केला. काही कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने धावले. मात्र, व्यासपीठावरील अन्य प्रमुखांनी (पान ९ वर)
इंद्रजित सावंत यांना धक्काबुक्की
By admin | Published: August 10, 2016 12:57 AM