या रॉलीत करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, शेतकरी संघटनेचे बाजीराव देवर्डे, एम. के. नाळे , भाकपचे दिनकर सूर्यवंशी जयवंत जोगडे, काँग्रेसचे बुद्धिराज पाटील, निवास पाटील, पै. उत्तम पाटील, सुभाष पाटील (वाकरे), सुनील कापडे, कुंडलिक पाटील (रयत संघ) यांच्यासह शंभर कार्यकर्ते सहभागी होते.
बीडशेड कसबा बीड, कोगे ,महे, सावरवाडी शिरोली दुमाला येथील बाजारपेठा बंद होत्या. ग्रामीण भागात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता़
( फोटो ओळ = बीडशेड (ता. करवीर) येथे ‘भारत बंद आंदोलना’स बाजारपेठा बंद ठेऊन १०० टक्के प्रतिसाद मिळाला तर दुसऱ्या छायाचित्रात बीडशेड येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. )