शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

प्रोटोकॉल बाजूला ठेवत राज्यपालांची चक्क भारतीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:17 PM

अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथी सभाचे आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी प्रोटोकॉल बाजूला ठेवत कोल्हापूरातील कार्यक्रमात चक्क भारतीय बैठकीत विराजमान झाले.

ठळक मुद्देप्रोटोकॉल बाजूला ठेवत राज्यपालांची चक्क भारतीय बैठकआचार्यश्री महाश्रमणजींचा सन्मान, कोल्हापुरात भक्ती पूजानगरमध्ये सत्कार

कोल्हापूर : अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथी सभाचे आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी प्रोटोकॉल बाजूला ठेवत कोल्हापूरातील कार्यक्रमात चक्क भारतीय बैठकीत विराजमान झाले.आचार्यश्री महाश्रमणजी यांचे तीन देश आणि वीस राज्यांमधून पदयात्रा करत मंगळवारी कोल्हापुरातील उत्तमचंद पगारिया यांच्या निवासस्थानी आगमन झाले. आज, बुधवारी मंगळवार पेठेतील भक्ती पूजानगर येथे भव्य राज्यस्तरीय नागरिक अभिनंदनाचा सोहळा पार पडला. सद्भावना नैतिकता व नशा मुक्तीसाठी झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यिारी उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील खास विमानाने या कार्यक्रमासाठी आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी उच्चासनावर आचार्यश्री महाश्रमणजी होते. मात्र प्रोटोकॉलच्या बाबतीत दक्ष असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी हे त्यांच्या सन्मानार्थ शेजारीच प्रोटोकॉल बाजूला ठेवत चक्क भारतीय बैठकीत विराजमान झाले होते.तत्पूर्वी, आचार्यश्री महाश्रमणजी यांचे पगारिया कुटुंबीय व पूर्वाश्रमीचे त्यांचे पुत्र मुनिश्री लक्षकुमारजी यांनी त्यांचे स्वागत केले. महावीर भवन, प्रतिभानगरमधून दोन किलोमीटर पदयात्रा करत कोल्हापूरच्या सकल जैन समाजाने भव्य पारंपरिक रॅली करीत आचार्यश्री यांचे उत्साहात स्वागत केले.

यावेळी मुंबई येथील भक्तांनी चारशे फूट लांब बॅनरसह जय ज्योती चरणच्या घोषणा देत आपला श्रद्धाभाव व्यक्तकेला. यावेळी आचार्यश्री, महाश्रमणजी, साध्वीप्रमुखाजी यांचेही व्याख्यान झाले. आचार्यजींच्या आगमनाने संपूर्ण जैन समाजामध्ये आध्यात्मिक व आनंदाचे वातावरण झाले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर