कोल्हापूर : महाराष्ट्रातील उद्योग धंद्याना विज दरामध्ये ५००० कोटी रुपयाची विशेष तरतूद करावी व प्रस्तावित विज दरवाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीच आवाज विधानभवनात आमदार चंद्रकांत जाधव यांनी उठवला. सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे चालु आहे.राज्यातील वीज दर आणिउद्योगधंद्यासमोरील अडचणी सदनासमोर मांडल्या.
महावितरण कंपनीने सप्टेंबर २०१८ पासून २५ ते ३०% वीज दरवाढ केली आहे. महावितरण कंपनीचा प्र. क्रं. ३२२/२०१९ प्रमाणे २० ते २५% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. शेजारच्या राज्यापेक्षा २५ ते ३५% वीज दरवाढ जास्त आहे. राज्यातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह उद्योग-धंद्यावरती अवलंबून आहे. सध्याच्या वीज दरवाढीमुळे उद्योजक प्रचंड प्रमाणात अडचणीत आहेत. त्यामुळे उद्योग धंदे बंद पडू लागले आहेत. तसेच उद्योजक आत्महत्या करणायच्या मानसिकतेत आहेत. उद्योग धंदे वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योग धंद्याना ५ हजार कोटींची विशेष तरतूद करून तसेच महावितरण कंपनीचा महावितरण कंपनीचा प्र. क्रं. ३२२/२०१९ प्रमाणे २० ते २५% वीज दरवाढ करण्याचा प्रस्तावास स्थगिती द्यावी. औद्योगीक क्षेत्रातील अडचणी दूर कराव्यात. अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी विधानभवनात केली.