शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

कोल्हापूरला ‘सायबर थ्रेट’ची लागण !

By admin | Published: May 26, 2014 1:08 AM

पोलिसांसमोर आव्हान : गुन्हेगारांकडून नवीन पद्धतींचा वापर

 एकनाथ पाटील, कोल्हापूर : बँकांच्या नावाने खोटे ई-मेल्स पाठवून गोपनीय माहिती घेणे, फेसबुक अकौन्ट हॅक करून अश्लील फोटो अपलोड करणे, नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक करणे, नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांचा डेटा चोरणे इतकेच नव्हे, तर व्हॉटस अ‍ॅपवरून महिलांना अश्लील मेसेज पाठविणे, अशा सायबर गुन्ह्यांची नोंद कोल्हापूर पोलिसांच्या दप्तरी वाढली आहे. गुन्हेगारांच्या नवीन मोडस लक्षात घेता, कोल्हापूर आता ‘सायबर थ्रेट’ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. खून, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, अशा गुन्ह्यांबरोबरच आता सायबर क्राइम ब्रँचमध्ये येणार्‍या या तक्रार अर्जांमध्ये सर्वांत जास्त तक्रारी बँकिंग फ्रॉड, नोकरीच्या आमिषाने फसवणूक आणि फेसबुकसंदर्भात आहेत. सायबर सेलमध्ये विविध प्रकारचे टेक्निकल गुन्हे आता दाखल होत आहेत. या गुन्ह्यांमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड फ्रॉड, बँकिंग फ्रॉड नोकरी देणार्‍या वेबसाईटवरून होणारी फसवणूक हे गुन्हे सर्वांत जास्त आहेत. परंतु सर्वांत गंभीर बाब म्हणजे फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप या सोशल मीडियाचा वापर एकीकडे वाढत असताना, त्या संदर्भात दाखल होणार्‍या गुन्ह्यांची आकडेवारी मात्र चिंताजनक आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल ८ गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सायबर सूत्रांनी सांगितले. एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे काढण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबतचे गुन्हे नेमके कसे घडतात, आॅनलाईन शॉपिंग आणि हॉटेलिंग करताना डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डाटा चोरून घेतला जातो. त्याचा उपयोग करून अकौन्टवरील पैसे काढून घेतले जातात. किंवा दुसर्‍याच्या खात्यात ट्रान्स्फर केले जातात. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांची संख्या कोल्हापुरात जास्त आहे. आॅनलाईन अर्ज स्वीकारून नोकरी देणार्‍या हजारो वेबसाईटस् देखील आहेत. परंतु यातील बनावट वेबसाईटदेखील आहेत. बर्‍याचदा नामांकित कंपनीच्या नावाने वेबसाईटस सुरू करून पैसे भरायला लावणे आणि अकौंटचे डिटेल्स घेऊन परस्पर पैसे ट्रान्स्फर करणे असे गुन्हे, तर दररोज घडत आहेत. नोकरीची अत्यंत गरज असल्यामुळे बर्‍याचदा अशा वेबसाईटवर उच्चशिक्षितही आपली वैयक्तिक माहिती पाठवून देतात किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून काही रक्कमही भरतात. त्यावेळी त्यांच्या अकौंटमधून वारंवार पैसे ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस येते. बँकांच्या बनावट वेबसाईटवरूनही बर्‍याचदा अकौन्टसंदर्भात माहिती मागविली जाते आणि त्यातूनही परस्पर पैस काढून घेतले जातात. काही सायबर गुन्ह्यांमध्ये थेट सीमकार्डच ब्लॉक केले जाते. त्यामुळे बँकेचे सर्व अलर्ट बंद होतात आणि आरोपी अकौंटमधून पैसे ट्रान्स्फर करून घेतात. हे गुन्हेगारांची नवीन मोडस आता समोर येत आहे. तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या फेसबुकचा वापर एकमेकांची बदनामी करण्यासाठी होऊ लागला आहे. राजकीय नेत्यांबाबतही फेसबुकवर बदनामीकारक फोटो आणि मजकूर प्रसिद्ध केले जातात. तरुणींचे फेसबुक हॅक करणे, त्याच्यावर अश्लील फोटो टाकणे, किंवा बनावट फेसबुक अकौंट उघडून त्यावर अश्लील मेसेज पाठविणे हे प्रकार वाढत आहेत. बँकिंग व्यवहार करताना तसेच आॅनलाईन शॉपिंग किंवा हॉटेलिंग करताना आपला डाटा चोरीला जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.