मलकापूर : शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी दिलेल्या मोबाइलचा वॉरंटी कालावधी संपला असून त्याच्या दुरुस्तीचा आर्थिक भार ही अंगणवाडी सेविकांना सोसावा लागत आहे. हे मोबाइल परत घेऊन शासनाने त्यांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने शाहूवाडी पंचायत समितीचे प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना शालेय कामकाजासाठी मोबाइल देण्यात आले आहेत. या मोबाइलचा वॉरंटी कालावधी हा संपून गेलेला आहे. त्याबरोबरच मोबाइल दुरुस्तीसाठी नेमलेली केंद्र हीदेखील दुरुस्तीसाठी अधिक पैसे घेत आहेत. त्याबरोबरच या मोबाइलला दिलेले इंग्रजीमध्ये आहे. ते मराठीत होऊन गरजेचे आहे. मोबाइल बंद असल्याने शालेय कामकाज करणे अडचणीचे ठरत आहे.
यावेळी अंगनवाडी कर्मचारी सेवा संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर, बिस्मिल्ला शिकलगार, नीता परीट, कलावती येळवणकर, मंगल पाटील, आशा चावरे आदीसह तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.