कागल तालुक्यात यंदा भात ६ हजार १०० हेक्टर, सोयाबीन ७ हजार ८०० हेक्टर, भुईमूग 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वच पिके दमदार आली होती. मात्र, गत महिन्यात पुरामुळे पिकांची प्रचंड हानी झाली.
दरम्यान, सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात आले असताना तांबेराचा प्रादुर्भाव झाला आहे. दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे तांबेराचा जोर वाढला असून, गत आठवड्यात हिरवेगार दिसणारे शिवार आता पिवळेधमक दिसत आहे. २४ तासांत एकराहून अधिक क्षेत्रात हा तांबेरा पसरत आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधी फवारणी करून होणारे नुकसान टाळण्यासाठी धडपड करीत आहेत.
कॅप्शन
म्हाकवे परिसरात सोयाबीनवर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याने कापणीपूर्वीच शेत असे पिवळीधमक दिसू लागले आहे.
छाया-दत्ता पाटील, म्हाकवे