गडहिंग्लज : थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी नळपाणी योजनेची वीज तोडण्यापूर्वी पंचायत समितीला माहिती द्यावी, अशी सूचना गटविकास शरद मगर यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिली.
थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळे नळ पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे समन्वयाने मार्ग काढण्यासाठी पंचायत समितीला माहिती मिळावी, अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यानुसार मगर यांनी ही सूचना केली.
तनवडी येथे तलाठी सज्जा असतानाही खमलेहट्टीला चावडी इमारत कशी मंजूर झाली असा सवाल पाटील यांनी विचारला. परंतु, हा विषय पंचायत समितीच्या अखत्यारित येत नसल्याचे मगर यांनी स्पष्ट केले.
सभेला विद्याधर गुरबे, जयश्री तेली यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.