महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाची आजरा नगरपंचायतीमार्फत अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानासंबंधित पंचतत्त्वावर विविध कामे करण्यात येत आहेत.
आजरा नगरपंचायतीतर्फे शहरातील वायू गुणवत्ता नियंत्रणात राहण्यासाठी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
शहरातील व्यापारी क्षेत्र, रहिवासी क्षेत्र व घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या ठिकाणी वायू गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. वायू गुणवत्ता तपासणीमुळे शहरातील वायू प्रदूषणाबाबत माहिती मिळणार आहे.
-------------------------
* शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने वायू गुणवत्ता तपासणी सुरू आहे. वायू प्रदूषणाबाबत जनजागृती व उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.
- ज्योत्स्ना चराटी, नगराध्यक्षा, आजरा नगरपंचायत.
-------------------------
फोटो ओळी :
आजरा नगरपंचायतीच्या टेरेसवर वायू गुणवत्ता तपासणीवेळी अरविंद पारपोलकर, प्रवीण करपे, संतोष कांबळे, रमेश कांबळे आदी.
क्रमांक : १५०१२०२१-गड- ११