शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

कोल्हापूर जिल्ह्यातील १४ शाळांच्या  कार्निव्हलला प्रारंभ, नवविचार, निर्मितीच्या आविष्काराला उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 6:51 PM

नेल आर्ट, टाकाऊतून टिकाऊ, मिक्स्ड कोलाज, नववधूचा मेकअप, स्मार्ट सिटी, शाळांमध्ये सीसीटीव्हीची गरज अशा विषयांवर वादविवाद अशा विविधांगी कलाविष्कारांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या नवविचार व निर्मितीच्या संकल्पांचे परीघ वाढविणाऱ्या ‘कार्निव्हल’ला शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

कोल्हापूर : नेल आर्ट, टाकाऊतून टिकाऊ, मिक्स्ड कोलाज, नववधूचा मेकअप, स्मार्ट सिटी, शाळांमध्ये सीसीटीव्हीची गरज अशा विषयांवर वादविवाद अशा विविधांगी कलाविष्कारांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या नवविचार व निर्मितीच्या संकल्पांचे परीघ वाढविणाऱ्या ‘कार्निव्हल’ला शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

न्यू पॅलेसमधील छत्रपती शाहू विद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्निव्हलचे उद्घाटन फुटबॉलपटू सपनाराणी व जर्मन खेळाडू अंजा यांच्या हस्ते झाले. यावेळी शाहू महाराज, याज्ञसेनीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, संचालिका राजश्री पाटील, प्राचार्या पद्मा मुंगरवाडी, सीबीएसई विभागाच्या शीतल पवार उपस्थित होत्या.यावेळी सपनाराणी म्हणाल्या, कोल्हापूरकरांची फुटबॉलप्रती असलेली आवड आणि प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. कोल्हापूरमध्ये खूप क्षमता व कौशल्य असून त्याद्वारे अनिकेत जाधवसारखे अनेक खेळाडू तयार होतील व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.

उद्घाटनाच्या सत्रानंतर कार्निव्हलमधील विविध स्पर्धांना सुरुवात झाली. एकीकडे विद्यार्थी आपल्या नखांवर सुरेख नक्षीकाम करीत होते. दुसऱ्या विभागात पुठ्ठे, पेपर, स्पंज, वापरलेले सॉक्स, खराब झालेल्या सीडी, कपडे, गिफ्ट रॅपर, कागदी प्लेट, प्लास्टिकचे ग्लास अशा टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविण्यात मुले कौशल्य पणाला लावत होती. आणखी एका दालनात नववधूचा सुंदर मेकअप सुरू होता.

मिक्स कोलाज या पद्धतीत कागदावर डाळींपासून, धान्याच्या साली, काड्यापेटीच्या काड्या, कापूस, कागदाचे तुकडे, पाना-फुलांच्या साहाय्याने सुरेख चित्र साकारण्यात आले. मुख्य हॉलमध्ये वेगवेगळ्या विषयांवर दोन संघांमध्ये वादविवाद सुरू होता. हा सगळा उत्सव पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्पर्धकांचे मनोबल वाढवीत होती. त्यांच्या धम्माल मस्तीने या कार्निव्हलमध्ये उत्साहाचे रंग भरले. या कार्निव्हलमध्ये जिल्ह्यातील १४ शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सायंकाळी स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले. 

कार्निव्हलमध्ये  विद्यार्थ्यांच्या स्पर्धाचक्रव्यूह (प्रश्नमंजूषा), तराणा (गायन), पुष्परचना, मास्टर शेफ, टाईल पेंटिंग, व्रेथ मेकिंग, अ‍ॅड बोनान्झा, डुडस अ‍ॅँड डॉल्स, द बोल्ड अ‍ॅँड द ब्यूटी, समूहनृत्य.खुल्या स्पर्धासुगम संगीत, कुकिंग, पुष्परचना, व्रेथ पेंटिंग, टाईल पेंटिंग, बेस्ट ड्रेस्ड

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय