शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

कोल्हापूर : पंचगंगा घाट संवर्धन समितीचा पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 5:07 PM

कोल्हापूर येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत.

ठळक मुद्देपंचगंगा घाट संवर्धन समितीचा पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पुढाकारशहरात सोमवारी जनजागृती रॅली

कोल्हापूर : येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत.

विशेष म्हणजे विसर्जनासाठी जी कुंडे ठेवण्यात येणार आहेत, त्यांमध्ये चारधाम यात्रांच्या नदीपात्रातील पाणी टाकले जाणार असल्याने अशा पवित्र पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे भाग्य कोल्हापूरकरांना मिळणार आहे.पंचगंगा घाट संवर्धन समितीचे अध्यक्ष सुमित वैद्य, उपायुक्त प्रमोद पुंगावकर, सचिव संजय आमुस्कर, खजानिस अमित सूर्यवंशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत समितीच्या उपक्रमाची माहिती सांगितली.पर्यावरणपूक गणेश विसर्जन उपक्रमाचा भाग म्हणून सोमवारी सकाळी नऊ वाजता भवानी मंडप येथून पर्यावरण जनजागृती फेरी वाढली जाणार आहे. या फेरीत समितीच्या कार्यकर्त्यांसह शालेय विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.

महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत या फेरीला प्रारंभ होईल. भवानी मंडप येथून सुरू होणारी ही फेरी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे पंचगंगा नदीघाट येथे विसर्जित होणार आहे.दीड दिवसाचा गणपती विसर्जन तसेच घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशी पंचगंगा नदीघाट, रंकाळा, कोटीतीर्थ येथे विसर्जन कुंड ठेवले जाणार आहेत. समितीचे स्वयंसेवक विसर्जित मूर्तीचा स्वीकार करतील. त्यानंतर महानगरपालिकेच्या सहकार्याने त्या इराणी खाणीत सोडल्या जातील. समितीचे स्वयंसेवक रहदारीची शिस्त लावण्यासाठीही मदत करतील.

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर