या अपघातील सचिन यांचे मित्र सुशांत गणपती पाटील (वय २८, रा. कंदलगाव) हे पण गंभीर जखमी असून त्यांच्यावरती सीपीआर येथे उपचार सुरू आहेत. सचिन संकपाळ हे त्यांचे मित्र सुशांत यांना घेऊन सोमवारी कावणे येथील आपले मेहुणे निवास पाटील यांचेकडे कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते रात्री दहाच्या सुमारास कंदलगाव या आपल्या गावी जात असताना कावणे फाट्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या स्वीफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामध्ये ते रस्त्यावरती आपटले. त्यांत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर त्यांचे मित्र सुशांत यांना पण जोराचा मार बसला होता.या दोघांना १०८ रुणवाहिकेतून सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच सचिन यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात झाली आहे. शांत, मनमिळाऊ स्वभाव व क्रिकेटप्रेमी असणाऱ्या सचिन यांचा मोठा मित्रपरिवार आहे. ते जमीन व प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांचे पश्चात पत्नी, चार वर्षाचा रुद्र , दोन वर्षाचा रूग्वेद, आई - वडील असा परिवार आहे.
हेल्मेट असते तर
सचिन यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली व ते क्षणात रस्त्यावरती आपटले जर त्यांनी डोक्याला हेल्मेट घातले असते तर सुदैवाने बचावले असते.