शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

इंटकवेल, जॅकवेलचे काम युद्धपातळीवर -आठवड्याला आढावा : ८० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:51 AM

वर्षातील आठ महिने धरणक्षेत्रात पाणी साचून राहत असल्याने तेथे इंटकवेल, जॅकवेलचे काम करणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. आठ महिन्यांतील दोन महिने केवळ इंटकवेल व जॅकवेलकरिता केलेल्या खुदाईतील पाणी उपसण्यात जातात.

ठळक मुद्देमहिन्याभरात पूर्ण करण्याचे नियोजन

कोल्हापूर : वर्षातील आठ महिने धरणक्षेत्रात पाणी साचून राहत असल्याने तेथे इंटकवेल, जॅकवेलचे काम करणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. आठ महिन्यांतील दोन महिने केवळ इंटकवेल व जॅकवेलकरिता केलेल्या खुदाईतील पाणी उपसण्यात जातात. उरलेल्या दोन महिन्यांत ही महत्त्वाची कामे करणे अवघड आणि किचकट होते. वरील भागातून मातीचे, दगडाचे ढिगारे कोसळायचे; तरीही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत शेकडो कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन कामाचा सपाटा सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पुर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा राबविली जात आहे.

धरणातील पाणी प्रथम इंटकवेलमध्ये घ्यायचे असून, त्याची खुदाई २५० मीटर इतकी करायची आहे. त्यापैकी ७० मीटरपर्यंत खुदाई पूर्ण झाली आहे. सध्या त्यातील गाळ काढण्याचे दिवसरात्र काम सुरू आहे. गाळ उचलण्याकरिता तीन जेसीबी आणि १२ डंपर्स अशी यंत्रणा काम करीत आहे. धरणातील गाळ काढून तो वरील भागात आणून टाकला जातो. विशेष म्हणजे इंटकवेलच्या खुदाई केलेल्या जागेत अजूनही पाणी असून, ते उपसण्याकरिता ५० एचपी क्षमतेचे ११ उपसा पंप लावले आहेत. इंटकवेलच्या कामास मार्च महिन्यापासून कामाला सुरुवात झाली आहे. पूर्ण क्षमतेने खुदाई करून झाल्यानंतर त्या ठिकाणी १७५ मीटर अंतरात १८०० मि.मी. जाडीच्या दोन मोठ्या जलवाहिन्या टाकल्या जातील. त्यातून जॅकवेलकडे पाणी घेण्यात येणार आहे.जॅकवेलचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर जॅकवेलकरिता केलेल्या खुदाईच्या जागेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. फेबु्रवारीत हे काम हाती घेतले. पाणी उपसण्याकरिता दोन महिने लागले.

अव्याहतपणे ५० एच.पी.चे १७ पंप हे पाणी उपसत होते. आता हा भाग पूर्णपणे मोकळा झाला असून एप्रिलपासून कामाला गती देण्यात आली आहे; कारण काम करण्यास केवळ अडीच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्या मुदतीतच हे काम करावे लागणार आहे. टॉवर, हायट्रा, नॉर्मल अशा तीन प्रकारच्या के्रेनच्या साहाय्याने येथे खाली स्टीलसह अन्य साहित्य उतरले जात आहे.अजूनही काही भागांत खरमाती साचलेली असून, ती उपसण्याक रिता तीन क्रेन, १२ डंपर्सच्या साहाय्याने सुमारे १०० कर्मचारी काम करीत आहेत. जॅकवेलच्या तळभागात पीसीसीचे काम पूर्ण झाले आहे. स्टील जोडण्यचे काम सुरू झाले आहे. वॉल तसेच तळभागातील कॉँक्रिटीकरणाचे काम पुढील आठवड्यात होणार आहे.उपसा यंत्रणापंप हाऊस - ३६.५० मीटर बाय २१.५० मीटर आयताकृती ; तर त्याची उंची अकरा मीटर असेलपंपिंग मशिनरी - ९४० अश्वशक्तीचे चार पंप, हेड ६८ मीटर, पाणीफेक क्षमता २६,१०,४०० लिटर्स प्रतितासतीन पंप २४ तास कार्यान्वित राहणार, एक पंप स्टॅँडबाय.१३ कोटींची व्हर्टिकल पंप खरेदी प्रक्रिया पूर्ण.१५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टइंटकवेल आणि जॅकवेलचे काम कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जर हे काम या मुदतीत पूर्ण झाले नाही, तर मात्र एक वर्ष काम रखडण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाला तर पुन्हा जॅकवेलमध्ये पाणी शिरून ते बंद पडेल अशी भीती आहे. त्यामुळे जादा यंत्रणा लावून २४ तास काम केले जात आहे. त्याकरिता हैदराबाद, कर्नाटक येथून कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आलेली आहे. कामाचा बारचार्ट तयार करून त्याचा आढावा स्वत: आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी घेत आहेत.१जॅकवेलची खुदाई अत्यंत धोकादायक होती. कुठे नुसती माती, तर कुठे दगडाची दरड. त्यामुळे खुदाई करताना अनेक वेळा आजबाजूची माती व दगडाचे ढिगारे कोसळण्याचे प्रकार घडले. या पार्श्वभूमीवर जीवितहानी होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागली. काम सुरू असताना मॉनिटरिंग करण्याकरिता दोन व्यक्ती बसविलेल्या आहेत. त्यांच्याकडे आजूबाजूच्या काठावरील मातीचे, दगडाचे ढिगारे कोसळतात का, याची दुर्बिणीच्या साहाय्याने टेहळणी करण्याचे काम सोपविले आहे.२एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काम करीत असताना ढिगारा कोसळणार ही बाब लक्षात येताच मॉनिटरिंग करणाºया कर्मचाºयांनी खाली काम करणाºया कर्मचाºयांना सावध केले आणि तेथून बाहेर काढले. काही वेळातच एक मोठा दगडी ढिगारा कोसळला. जर पूर्वसूचना मिळाली नसती तर २२ लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे ही दक्षता घेऊनच काम केले जात आहे.आॅन दी स्पॉटथेट पाईपलाईन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण