कोल्हापूर : गोकुळमध्ये मागील तीन-चार वर्षात भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. कोणताही निर्णय घेताना मनमानी घेतल्यास याद राखा, अशा शब्दात अधिकाऱ्यांची दोन तास झाडाझडती घेतली. वारणा,राजारामबापू दूध संघापेक्षा प्रतिलिटर २० पैसे जादा टँकरचे वाहतूक भाडे होते. ते तातडीने कमी करण्याचे आदेशही देण्यात आले.गोकुळमध्ये सत्तांतर होऊन एक महिना तीन दिवस झाल्यानंतर राजर्षि शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी अमृतकलश पूजन निमित्ताने दूध प्रकल्प कार्यालयात आढावा बैठक घेतली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीपुर्वी अधिकाऱ्यांना प्रश्नावली दिली होती, त्या माहीतीनुसार संघाच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांसमोर सादरीकरण केले.सध्याचे दूध संकलन, अस्थापनासह इतर बाबींवर होणारा खर्च, संघामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, दूध वितरण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था व त्यावरील खर्च संघाची सध्याची आर्थिक स्थिती आदी बाबींची माहीती कार्यकारी संचालक व इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. तब्बल दोन तास झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी संघातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले.बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार विनय कोरो, राजेश पाटील, प्रकाश आबीटकर, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, राजू आवळे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, सुजीत मिणचेकर, ह्यगोकुळह्णचे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक उपस्थित होते.
Gokul Milk Kolhapur : भरतीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 6:36 PM
Gokul Milk Kolhapur : गोकुळमध्ये मागील तीन-चार वर्षात भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. कोणताही निर्णय घेताना मनमानी घेतल्यास याद राखा, अशा शब्दात अधिकाऱ्यांची दोन तास झाडाझडती घेतली. वारणा,राजारामबापू दूध संघापेक्षा प्रतिलिटर २० पैसे जादा टँकरचे वाहतूक भाडे होते. ते तातडीने कमी करण्याचे आदेशही देण्यात आले.
ठळक मुद्देभरतीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करागोकुळच्या आढावा बैठकीत नेत्यांचे आदेश