लोकमत न्यूज नेटवर्क
सरुड : शाहूवाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्ट कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे
संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाहूवाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून शासनाने ठरवून दिलेल्या स्टॅम्प ड्युटी व पावती व्यतिरिक्त अतिरिक्त अवाजवी पैसे घेतले जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजाव्यतिरिक्त पैसे द्यावे लागतात. तसेच अधिकारी नागरिकांची राजरोसपणे आर्थिक लूट करीत आहेत. कार्यालयात नागरिकांना लुटणारी साखळी तयार झाली आहे . त्यामुळे या दुय्यम निबंधक कार्यालयातील सुरू असलेल्या भ्रष्ट कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करून यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही श्रीकांत कांबळे यांनी केली आहे.