कोल्हापूर : रघुनाथ दादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शिये ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून बदनामी करणाऱ्या ॲड. माणिक शिंदे याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिये गावच्या सरपंच रेखा जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे गुरुवारी केली. निवासी जिल्ह्याधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
मौजे शिये (ता. करवीर) येथील गावठाण सर्व्हे नंबर २५९ व २८३ मध्ये अनेक पूरग्रस्तांना प्लॉट मिळाले आहेत. येथील विकासकामात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, कोतवालांना वेठीस धरून कामे बंद पाडत आहेत. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत, ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेची बदनामी करत आहेत. त्यांच्या सततच्या या प्रकारामुळे नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी त्रस्त झाले आहेत. शिये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा गट पराभूत झाल्याच्या नैराश्यातून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून भडकविण्याचे काम करत आहेत. तरी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच शिवाजी गाडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी सरपंच रणजित कदम, माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, ग्रामपंचायत सदस्य विलास गुरव, तेजस्विनी पाटील, पूनम सातपुते, मंगल कांबळे, कृष्णात चौगुले, प्रभाकर काशीद, बाबासाहेब बुवा, जयसिंग फडतारे, नीलेश कदम, नीलेश कांबळे, मच्छिंद्र मगदूम, शिवाजी रानगे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
--
गुरव खडी इथे पुनर्वसन करा
शिये गावाला यंदा महापुराचा फटका बसला होता. गावातील ३७० हून अधिक घरे पाण्याखाली गेली होती. या सर्वांचे पुनर्वसन शिये गावातील गुरव खडी या ठिकाणी व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
----
फोटो नं १२०८२०२१-कोल-शिये निवेदन
ओळ : शिये ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना, प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या शेतकरी संघटनेची चौकशी करा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
----