कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान झाले. संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई क रावी, अशी मागणी करीत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने गुरुवारी मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये याबाबत सदस्यांनी आवाज उठवावा, या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. कृती समितीच्या वतीने ‘संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा’, ‘झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?’, ‘खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे,’ असे फलक हातांमध्ये घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला.यावेळी खेळाडू पृथ्वीराज शिंदे, अक्षय वाळके, अखिल मोरे, राजू मालेकर, दीपक गौड, उत्तम वंदुरे, मानसिंग पाटील, चंद्रकांत बराळे, संभाजी जगदाळे, चंद्रकांत पाटील, लहुजी शिंदे, रामभाऊ कोलेकर, प्रदीप मोरे, शुभम मुळेकर, अमर ढेरे, करण खाडे, आदिनाथ गौड, प्रसाद पाटील, अक्षय खरबडे, अनिकेत कोर्इंगडे, सुशांत पाटील, चंचल देशपांडे, सुरेश पाटील, अंजुम देसाई, साहील मुजावर, आदी उपस्थित होते.