ते पुढे म्हणाले, डॉ. पॉल मनमानी कारभार करत असून कधी त्या लोकांना टोकण घेण्यास सांगतात, तर कधी रांगेत उभा राहायला सांगतात. उपलब्ध लस व नागरिकांना दिलेली लस याबाबत तफावत आढळून येत आहे. सकाळी सहापासून लसीकरणासाठी रांगा लागतात. शंभरएक लोकांना लस दिली जाते व दुपारी तीनच्या दरम्यान लस संपल्याचे जाहीर केले जाते. त्यानंतर मागील दरवाजातून विशिष्ट लोकांना लस दिली जात असल्याचा आरोप नंदवानी यांनी केला. प्राधान्य लोकांचे नाव पुढे करून ४० ते ५० डोस राखीव ठेवण्यात येतात, ही बाब संशयास्पद आहे. याविरोधात आवाज उठवल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करेन, असे डॉ. पॉल धमकावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कारभाराची चौकशी होऊन त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी नंदवानी यांनी केली.
गांधीनगर रुग्णालयाच्या अधीक्षकांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:26 AM