शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

‘गायकवाड’ कारखान्याची ‘८३’ अन्वये चौकशी होणार

By admin | Published: April 15, 2017 12:12 AM

डी. ए. चौगुले यांची नियुक्ती : दाखल तक्रारीनुसार आदेश

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरसोनवडे-बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची सहकार कायदा कलम ८३ नुसार चौकशी करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिले आहेत. चौकशीसाठी निवृत्त विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) डी. ए. चौगुले यांना प्राधिकृत केले असून, येत्या चार दिवसांत ते चौकशी सुरू करणार आहेत. भाडेकरार करताना कारखान्याचे साडेतीन कोटींचे नुकसान केल्यासह प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कलम ७८ नुसार व्यवस्थापनावर कारवाई का करू नये? या नोटिसीतील काही मुद्द्यांचा समावेश चौकशीत आहे. गायकवाड कारखान्याच्या २००७ पासूनच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी कारखान्याचे सभासद स्वप्निल शंकर पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली होती. लेखापरीक्षकांनी प्रत्येक वर्षीच्या अहवालात दोष दाखवून कारवाईबाबत स्पष्ट निर्देश करूनही कारवाई का होत नाही, हा मुद्दाही पाटील यांनी रेटला होता. लेखापरीक्षकांनी २००८ पासून अहवालात ठेवलेल्या ठपक्यांची दखल घेऊन साखर सहसंचालक सचिन रावल यांनी १६ आॅक्टोबर २०१६ रोजी ‘आपल्यावर कलम ७८ नुसार कारवाई का करू नये?’ अशी नोटीस काढली होती. या नोटिसीला व्यवस्थापनाने उत्तर दिले; पण हाच मुद्दा घेऊन स्वप्निल पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत चौकशीची मागणी केली. न्यायालयाने साधारणत: डिसेंबर २०१६ मध्ये नोटीस पोहोचल्यापासून दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश सहसंचालकांना दिले होते. निवृत्त विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) डी. ए. चौगुले यांची नियुक्ती केली आहे. येत्या चार दिवसांत चौगुले हे चौकशी सुरू करणार आहेत. संपूर्ण ठपक्यांची ते चौकशी करणार की मोजक्या मुद्द्यांवरच ते आपला अहवाल सादर करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सहसंचालकांच्या ‘७८’ नुसार कारवाई नोटिसीत हे असणार मुद्देरेणुका शुगर्स स्टोअर मालामधील गैरव्यवहारऊस बियाण्यांची रक्कम परस्पर जमातोडणी वाहतूक यंत्रणेत गैरव्यवहारमोलॅसिस विक्रीतील तफावतबेकायदा तोडणी वाहतूक खर्चकर्ज न दाखविता परस्पर वापरल्याने संस्थेचे नुकसानअबकारी कर वसूल; पण भरणा केलेला नाही.साखर माल तारणमधील गैरव्यवहारविश्वास साखर कारखाना करारातील तोटासाखर बारदान जमाखर्चकर्नाटक एजंट ऊस खरेदी ऊसतोडणी वाहतूक भाडे