शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Kolhapur: पन्हाळा किल्ल्याच्या मराठा स्थापत्यशैलीची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी

By संदीप आडनाईक | Published: October 05, 2024 6:54 PM

पन्हाळा/ कोल्हापूर : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने शनिवारी कोल्हापूर ...

पन्हाळा/कोल्हापूर : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील मराठा स्थापत्य शैलीतील विविध ठिकाणांना भेट देउन पाहणी केली. हे पथक सुमारे साडेतीन तास पन्हाळ्यावर होते. दरम्यान, किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी, स्थानिक नागरिकांशीही या पथकाने संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा मिळेल असी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली आहे.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने सकाळी ८ वाजल्यापासून किल्ल्याची तटबंदी, मराठा स्थापत्य शैलीतील पडकोट, इमारती, पावनगडाची त्यांनी सखोल पाहणी केली. या पथकाने धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, तीन दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक आणि मराठा लष्कर स्थापत्य शैलीतील खुणांची पाहणी केली. आयकोमॉसचे आंतरराष्ट्रीय तज्ञहेवान्ग ली यांनी सोबत आणलेल्या नकाशाबरहुकूम मराठा स्थापत्याची माहिती घेतली. याशिवाय किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल त्यांनी तपशीलवार माहिती घेतली. हे पथक साडेबारा वाजेपर्यंत गडावर होते.या पथकामध्ये हेवान्ग ली यांच्यासह एएसआयचे अतिरीक्त महानिर्देशक (जागतिक वारसा) जानवीश शर्मा, राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाचे संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, डॉ. शुभा मजुमदार यांचा समावेश होता. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली मडकर, मुख्याधिकारी चेतन माळी, पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, चेतन भोसले यांच्यासह समितीचे आर्किटेक्चर अक्षय लाड, इतिहास अभ्यासक शिवप्रसाद शेवाळे, स्मिता काशीद, शीतल घाटगे, मिलिंद बांदिवडेकर यांनी भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड