इचलकरंजी : शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नऊ प्रोसेसर्स बंद केल्या होत्या. त्या सुरू असल्याची तक्रार मंडळाकडे आल्याने शुक्रवारी संबंधित प्रोसेसर्सची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी हे उद्योग बंद असल्याचे स्पष्ट झाले. अचानक मंडळाने प्रोसेसर्स व सायझिंगची पाहणी केल्याने या उद्योजकांमध्ये खळबळ उडाली.
कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोससर्सचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषण होत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहर व परिसरातील उद्योगांची पाहणी केली आणि नऊ प्रोसेसर्सवर फेब्रुवारी महिन्यात बंदची कारवाई केली. या नऊ प्रोससर्सपैकी काही प्रोसेसर्स सुरू असल्याची तक्रार झाल्याने त्यांनी शुक्रवारी अचानक पाहणी केली. या पथकात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, सहाय्यक अधिकारी एस. बी. मोरे, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पालिकेचे जलअभियंता सुभाष देशपांडे, अंकिता मोहिते आदींचा समावेश होता.