शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

भुदरगड तहसीलचे काम प्रेरणादायी

By admin | Published: January 07, 2015 9:01 PM

कीर्ती नलावडे : गंगापूर येथे सुवर्णजयंती कार्यक्रमास प्रतिसाद

गारगोटी : शेतकऱ्यांना दाखले व इतर शासकीय कामांसाठी कार्यालयाकडे मारावे लागणारे हेलपाटे कमी करून गावातच दाखले मिळून त्यांचा होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी शासनाने सुरू केलेली सुवर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत समाधान योजना ही नावाप्रमाणेच समाधानकारकरीत्या राबविली जात आहे. त्याबद्दल भुदरगड तहसील आणि गंगापूरवासीयांचे काम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार आजरा भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी काढले.गंगापूर (ता. भुदरगड) येथे आयोजित केलेल्या सुवर्णजयंती राजस्व अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी पशुसंवर्धन विभागामार्फत पशूंचे लसीकरण, आरोग्य विभागामार्फत विद्यार्थी व ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी, तर कृषी विभागामार्फत कृषिपूरक योजनेची सविस्तर माहिती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर महसूल विभागामार्फत दुबार रेशनकार्ड, रेशनकार्डावरील नावे कमी -जास्त करणे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य धनादेश वाटप, विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात तहसीलदार शिल्पा ओसवाल, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, ‘बिद्री’चे ज्येष्ठ संचालक पंडितराव केणे, पं. स.चे सभापती विलास कांबळे, मंडल अधिकारी पी. डी. बुजरे, सरपंच संजयराव जाधव, तलाठी कल्पना माने, ग्रामसेवक अमोल चिखलीकर, ग्रा. पं. विस्तार अधिकारी विश्वास सुतार, सदस्य तानाजीराव जाधव, बाळासाहेब केणे, अनिल गोडसे, मुख्याध्यापक रमेश कोळी, कृषी सहायक शिंदे, आदी उपस्थित होते. दयानंद म्हेतर यांनी सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)