इचलकरंजी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन व जनजागृती करण्याचे व्हिजन इचलकरंजी या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच वृक्षारोपणाचे संस्कार लहान मुलांतही रुजवले पाहिजेत, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘व्हिजन ग्रीन सिटी’ अंतर्गत रोप वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी, पर्यावरण दिनानिमित्त तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवून व्हिजन इचलकरंजी या संस्थेने नागरिकांना या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी केले आहे. वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संवर्धन करू या, तरच इचलकरंजी ग्रीन सिटी संकल्प पूर्ण होईल, असे सांगितले.
व्हिजन ग्रीन सिटी अंतर्गत नागरिकांना मोफत देशी रोप उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी नागरिकांतून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. दिवसभरात ५०० रोपांचे वाटप करण्यात आले. हातकणंगलेचे वन विभागाचे अधिकारी आर. के. देसा, गजानन सकट, एस. एस. जाधव, यांच्यासह माजी अधिकारी घनश्याम भोसले यांनी देशी झाडांची माहिती दिली.
प्रारंभी गजानन महाजन गुरुजी, संदीप जैन, शिवजी व्यास, प्रोजेक्ट चेअरमन गोपाल खंडेलवाल, राजेश व्यास, स्वप्निल मद्यापगोळ, सुयोग नलवडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कौशिक मराठे, अशोक पाटणी, विजय पाटील, केदार सोमण, उल्हास अतितकर, विजय कुडचे, पवन तिबडेवाल, महावीर भन्साळी यांच्यासह व्हिजन इचलकरंजीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
०५ इचलकरंजी जयश्री गायकवाड
(फोटो ओळी)
इचलकरंजी तेथे व्हिजन संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कौशिक मराठे, अशोक पाटणी, विजय पाटील, केदार सोमण, उल्हास अतितकर, विजय कुडचे, पवन तिबडेवाल, महावीर भन्साळी यांच्यासह व्हिजन इचलकरंजीचे कार्यकर्ते उपस्थित होते.