कोल्हापूर : शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आजरा तालुक्यातील मुमेवाडीचे ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याला निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी डवरी याला तडकाफडकी निलंबित केले. काल, गुरुवारी ही घटना उघडकीस येताच एका रात्रीत चौकशी करून चोवीस तासांत हे निलंबन करण्यात आले.'तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते'वयाच्या अवघ्या विसाव्या ऋषिकेश जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर लढताना १३ नोव्हेंबर २०२० रोजी शहीद झाले. त्यांच्याच आई-वडिलांना ग्रामसेवक राजेंद्र डवरी याने अपमानास्पद शब्द वापरल्याची संतापजनक घटना काल, गुरुवारी समोर आली. तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते असे अपमानास्पद शब्द ग्रामसेवक डवरी याने वापरले. यानंतर जोंधळे कुटुंबीयांनी डवरी याच्याकडून होत असलेल्या मानसिक व मानहानीकारक त्रासापासून आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्याकडे केली होती.भरचौकात फलक लावून जोंधळे कुटुंबीयांची बदनामीमुलगा देशासाठी शहीद झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून राज्यभरातून अनेक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी माझ्या घरी भेट देत आहेत. मात्र ग्रामसेवक डवरी याला या गोष्टी खटकत असल्याने तो जोंधळे परिवाराचा अपमान करीत होता. इतकच नाही तर भरचौकात फलक लावून जोंधळे कुटुंबीयांची बदनामी केली.
'देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं', शहीद जवानाबद्दल अपशब्द वापरणारा ग्रामसेवक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 6:42 PM