शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

विमा कंपनीच्या बोगस पावत्यांद्वारे गंडा; दोघांना अटक

By admin | Published: February 17, 2015 12:11 AM

सकृतदर्शनी एक लाख ४२ हजारांची फसवणूक असली, तरी मोठी रक्कम अडकली असण्याची शक्यता

आजरा : रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीची बोगस पावतीबुके छापून आठजणांना एक लाख ४२ हजार रुपयांना गंडविल्याप्रकरणी आजरा पोलिसांनी अंजली रवींद्र पाटील (रा. बिद्री मौनीनगर, ता. कागल) या तरुणीसह सुनील महादेव बिरंबोळे (रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), धीरज जयसिंग पाटील या तिघांना अटक केली आहे. सकृतदर्शनी एक लाख ४२ हजारांची फसवणूक असली, तरी यामध्ये मोठी रक्कम अडकली असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत.याबाबत पोलीस निरीक्षक सी. बी. भाले यांनी दिलेली माहिती अशी : अंजली पाटील, सुनील बिरंबोळे व धीरज पाटील यांनी आजरा येथील मयूर पेट्रोल पंपानजीक रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय सुरू करून विमा उतरविण्यासाठी ग्राहकांकडून ११ एप्रिल २०१३ ते २७ मे २०१४ या कालावधीत अनेकांकडून पैसे घेतले. सुरुवातीला कंपनीची अधिकृत कागदपत्रे दिली. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या हप्त्याकरिता बोगस पावत्या ग्राहकांना दिल्या.दरम्यान, कार्यालय बंद झाले. पावत्यांवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा ग्राहकांनी प्रयत्न केल्यावर संपर्क होत नसल्याचे लक्षात आले. अखेर कासार-कांडगाव येथील शिवाजी विठोबा गुरव व अन्य ठेवीदारांनी पोलिसांत तक्रार दिली. कंपनीच्या गडहिंग्लज येथील कार्यालयात तक्रारदारांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गेले दोन महिने पोलीस या तिघांच्या शोधात होते. अखेर त्यांना राधानगरी व कोल्हापूर येथे अटक करण्यात यश मिळाले.पुढील तपास आजरा पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक सी. बी. भालके करीत आहेत.