शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

कोल्हापूरकरांना आज सायंकाळी पहायला मिळणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 3:38 PM

खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. विशेषत: कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना अवकाशात मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची सुवर्णसंधी आज सायंकाळी मिळणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांना आज सायंकाळी पहायला मिळणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकजगभरातील सोळा देशांचा प्रकल्प, युरोपियन देशांचा प्रत्यक्ष सहभाग

कोल्हापूर : खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. विशेषत: कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना अवकाशात मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची सुवर्णसंधी आज सायंकाळी मिळणार आहे.कोल्हापूरकरांना सायंकाळी पाहता येईल स्थानकआज सायंकाळी असाच योग येईल. सायंकाळी साधारण ७.२५ वा. पासून ७ ३५ वा. पर्यंत हे स्थानक आपण पाहू शकतो. ७.२५ वा. हे स्थानक दक्षिण-पश्चिम दिशेतून वर येताना दिसेल. सिंह राशीतला मघा तारा आणि कन्या राशीतला चित्रा तारा यांच्या मध्ये हे स्थानक ७.३० वाजता दिसणार आहे आणि ते शोधायलाही सोपे जाणार आहे. हे अवकाश स्थानक बरोबर सहा मिनिटे दिसणार असून कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना ते साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे.

हे अवकाश स्थानक पृथ्वी भोवती फेऱ्या मारत असताना कधी कधी आपल्या कोल्हापूर वरूनही जाते आणि ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, आणि आनंदाची बाब अशी कि आज सायंकाळी ७.३0 वाजता ही संधी मिळणार आहे.डॉ. अविराज जत्राटकर,खगोल अभ्यासक, कोल्हापूर 

आंतराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस)पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत फिरणारी आणि मानवाला उघड्या डोळ्यांनी दिसणारी सर्वात मोठी मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस). साधारणत: फुटबॉलच्या मैदानाएवढे आकाराने मोठे असणारे हे स्थानक पृथ्वी भोवती ४०० किलोमिटर उंचीवरून दिवसाला जवळपास १५ फेऱ्या पूर्ण करते. तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे.२० नोव्हेंबर १९९८ पासून आतापर्यंत म्हणजे १९ वर्षांहून जास्त काळ ते त्याचे काम अतिशय उत्तम करत आले आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खागोलशास्त्र, हवामानशास्त्र इत्यादीबद्दल संशोधन आणि विविध चाचण्या करणे हे या स्थानकाचे उद्धिष्ट आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले गेलेले संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे.असे आहे हे अवकाश स्थानकस्थानकाला रशियन आॅर्बिटल सेगमेंट (आरओएस) आणि युनायटेड स्टेट्स आॅर्बिटल सेगमेंट (युएसओएस) अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. याची लांबी २४० फूट, तर रुंदी ३३६ फूट आहे. यामध्ये सहा व्यक्ती एका वेळेस राहण्याची व्यवस्था आहे. २ नोव्हेंबर २००० पासून या स्थानकात सलग १७ वर्षे, २०० दिवस अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. आयएसएस २०२४ पर्यंत अनुदानित आहे आणि २०२८ पर्यंत कार्यरत राहण्याची शक्यता आहे.या स्थानकाची बांधणी अवकाशातच करण्यात आली. निरनिराळ्या मोहिमांमध्ये अंतराळ स्थानकाचे सुटे भाग स्पेस शटल डिस्कव्हरी आणि इतर वाहने जसे स्पेस शटल अटलांटिस च्या मदतीनं तेथे नेण्यात आले. आधीच्या मोहीमेतील स्पेस-शटलमधून तेथे गेलेल्या अंतराळवीरांनी हे सुटे भाग मुख्य स्थानकाच्या यंत्रणेला जोडले आणि आवश्यक त्या यंत्रणा सुरू केल्या केल्या.या स्थानकात जीवशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि रसायनशास्त्रात केले जाणारे प्रयोग असतील. पृथ्वीवरील गुरुत्वीय बलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. या स्थानकावर, मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येण्याच्या उद्देशाने, वजनविरहित अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल याचा अभ्यास केला जात आहे: संशोधन करण्यासाठी साधारणपणे दर सहा महिन्यांनी अंतराळवीरांचा नवा चमू पृथ्वीवरून पाठविला जातो.

 

टॅग्स :scienceविज्ञानkolhapurकोल्हापूर