शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

आंतरराज्य टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 1:17 AM

साडेचार लाखांचा माल जप्त : सांगली, निपाणी परिसरातही चोऱ्या

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, निपाणी परिसरात जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व मोटारसायकली चोरी करणाऱ्या कुख्यात आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकली, दहा तोळे सोने, चार मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. संशयित आरोपी गणेश रतन नवले (वय २५), संदीप चंद्रकांत सोनवणे (२८, दोघे रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले), प्रशांत तानाजी ननवरे (२१, रा. निमशिरगाव, ता. शिरोळ), विकास काशीनाथ नाईक (२४, रा. नागाव, ता. हातकणंगले), अरुण रामू चव्हाण (२८, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पुणे-बंगलोर महामार्गावर २६ सप्टेंबरला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक शावीर दिलीप गायकवाड (३८, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) हा कोचीला निघाला होता. कागल येथे चढतीला ट्रक हळूहळू निघाल्यानंतर चौघाजणांनी ट्रकच्या दोन्ही बाजंूनी चढून चालक गायकवाड याच्यावर खुनी हल्ला करून त्याच्याजवळील पैसे व मोबाईल चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तपास करीत असताना पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत ननवरे व गणेश नवले यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर, सांगली, निपाणी परिसरात मोटारसायकल चोरीसह लुटमारीचे गुन्हे केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार रविवारी वडगाव व शिरोली एमआयडीसी येथे दोन्ही पथकांनी सापळा रचून संशयिताना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत जिल्ह्यात महामार्गावर तीन लुटमारी, एक मोटारसायकल चोरी, चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे, सांगली येथे एक मोटारसायकल व निपाणी येथून दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. संशयित हे रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वारांना अडवून चाकूचा धाक दाखवून लुटमार करीत होते. त्यांना आज, सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, सहायक पोलिस निरीक्षक इलियास सय्यद, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, युवराज आठरे व कर्मचारी उपस्थित होते. कारागृहातच गँग स्थापन गणेश नवले व संदीप सोनवणे हे दोघे चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये बिंदू चौक कारागृहात कच्चे कैदी म्हणून काही महिने राहिले. यावेळी त्यांची प्रशांत ननवरे, विकास नाईक व अरुण चव्हाण यांच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांनी कारागृहातच गँग तयार केली. बाहेर पडल्यानंतर लुटमार व चोरीचे गुन्हे करूलागले.