कोल्हापूर : गेल्या दीड वर्षभरापासून प्रभारी असलेल्या शिवाजी विद्यापीठातील कुलसचिव पदासाठी दि. १५ नोव्हेंबरला मुलाखतीची प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत १७ उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.कुलसचिव पदासाठीची निवड प्रक्रिया विद्यापीठाने दि. २७ मेपासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रशासनाने दि. १६ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार ५० जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. या आॅनलाईन अर्जाची प्रत विद्यापीठ कार्यालयात जमा करावयाची मुदत दि. २१ जूनपर्यंत होती. या मुदतीपर्यंत आणि वेळेत २८ जणांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. या अर्जांच्या छाननीतून मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी १७ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामध्ये किशोर माने, राजसिंग चव्हाण, सयाजीराजे मोकाशी, भारतभूषण कांबळे, भारत पाटील, जयंत देशमुख, सर्जेराव शिंदे, सुनील मिरगणे, गोविंद कोळेकर, संजय माळी, संजयकुमार गायकवाड, शरद फुलारी, धनंजय माने, मिलिंद गोडबोले, यशवंत कोळेकर, पंढरीनाथ पवार, विलास नांदवडेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, या पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. १५ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या हॉलमध्ये होणार आहेत. आठ सदस्यीय असलेल्या कुलसचिव निवड समितीतर्फे संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, गणेशोत्सव, दसरा या सणांमुळे निवड समितीतील तज्ज्ञांची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे मुलाखती लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. तज्ज्ञांनी वेळ दिल्यानुसार १५ नोव्हेंबरला मुलाखती होतील. (प्रतिनिधी)
कुलसचिव पदासाठी १५ नोव्हेंबरला मुलाखती
By admin | Published: October 19, 2016 12:34 AM