गडहिंग्लज :दैनंदिन काम प्रामाणिकपणे करण्याबरोबरच विविध शासकीय योजना आणि उपक्रमात अधिकारी व कर्मचारी मनापासून झटल्यामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला केंद्र व राज्याकडून अनेक मान-सन्मान मिळाले. किंबहुना, त्यांच्या योगदानामुळेच गडहिंग्लजनगरीचा नावलौकिक सर्वदूर पोहोचला, असे गौरवोद्गार नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी काढला.गडहिंग्लज नगरपालिकेच्या १३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कर्मचारी सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष महेश कोरी, विरोधी पक्षनेते हारूण सय्यद यांच्यासह सर्व नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.सय्यद म्हणाले, गडहिंग्लज पालिकेला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी तो प्राणपणाने जपला आहे. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर म्हणाले, गडहिंग्लजनगरीला समृद्ध वैचारिक वारसा असून कर्मचाºयांचा वीमा उतरविण्यासाठी नगरसेवक वर्गणी काढतात ही दुर्मिळ गोष्ट गडहिंग्लजमध्येच पहायला मिळाली.यावेळी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, लेखापाल शशीकांत मोहिते, सागर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. गं्रथपाल राजू भुर्इंबर यांनी सूत्रसंचलन केले. नगरसेविका वीणा कापसे यांनी आभार मानले.कर्मचारी भारावले..!खातेप्रमुखांसह कायम व कंत्राटी मिळून २७५ कर्मचाºयांचा वीमा प्रमाणपत्र, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून हृद्य सत्कार करण्यात आला. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी भारावून गेले.कृतज्ञतेपोटीच सन्मान..!सातवा वेतन आयोग, वेतनवाढी, अनुकंपा व वारसा हक्काचा लाभ यासाठी कुणालाही भेटण्याची वेळ येवू दिली नाही. कर्तव्य आणि कृतज्ञतेच्या भावनेतूनच कर्मचाºयांचा सन्मान केला, असे नगराध्यक्षा कोरींनी आवर्जून सांगितले.
गडहिंग्लजच्या नावलौकिकात कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान : स्वाती कोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 1:12 PM
Muncipal Corporation Gadhinglaj Kolhapur : दैनंदिन काम प्रामाणिकपणे करण्याबरोबरच विविध शासकीय योजना आणि उपक्रमात अधिकारी व कर्मचारी मनापासून झटल्यामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला केंद्र व राज्याकडून अनेक मान-सन्मान मिळाले. किंबहुना, त्यांच्या योगदानामुळेच गडहिंग्लजनगरीचा नावलौकिक सर्वदूर पोहोचला, असे गौरवोद्गार नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी काढला.
ठळक मुद्देगडहिंग्लजच्या नावलौकिकात कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान : स्वाती कोरीपालिकेच्या १३४ व्या वर्धापनदिनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान